महिनाभरात साई संस्थानला नवे विश्वस्त मंडळ
By Admin | Updated: November 29, 2014 01:15 IST2014-11-29T01:15:58+5:302014-11-29T01:15:58+5:30
महिनाभरात नवीन विश्वस्त मंडळ अस्तित्वात येण्याची शक्यता वर्तवली जात आह़े नव्या मंडळात वर्णी लागण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आह़े

महिनाभरात साई संस्थानला नवे विश्वस्त मंडळ
शिर्डी (जि. अहमदनगर) : गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या संस्थानच्या विश्वस्त मंडळ नेमणुकीच्या हालचाली सुरू झाल्या असून, महिनाभरात नवीन विश्वस्त मंडळ अस्तित्वात येण्याची शक्यता वर्तवली जात आह़े नव्या मंडळात वर्णी लागण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आह़े
जनहित याचिकेमुळे 26 मार्च 2क्11 रोजी न्यायालयाने जयंत ससाणो यांच्या अध्यक्षतेखालील विश्वस्त मंडळ बरखास्त केले होत़े तेव्हापासून संस्थानचा कारभार पाहण्यास उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली जिल्हा प्रधान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आह़े समितीत नगरचे जिल्हाधिकारी व संस्थानच्या कार्यकारी अधिका:यांचा समावेश आह़े
पावणोतीन वर्षात आघाडी सरकार अन्य महामंडळाप्रमाणोच संस्थानचे व्यवस्थापन मंडळही नियुक्त करू शकले नाही़ मंडळात अध्यक्ष, उपाध्यक्षांसह 16 सदस्य आहेत़ आघाडी सरकारच्या फॉम्यरुल्यानुसार, शिर्डी देवस्थान काँग्रेसकडे तर सिद्धिविनायक देवस्थान राष्ट्रवादीकडे होत़े शिर्डीत काँग्रेसच्या अध्यक्षांसह आठ सदस्य तर राष्ट्रवादीचे उपाध्यक्षांसह आठ सदस्य नियुक्त करण्यात आले होत़े मात्र या राजकीय नियुक्त्यांनाही न्यायालयात आव्हान देण्यात आले होत़े
आता भाजपा व सेनेतील तिढा सुटला तर युतीच्या फॉम्र्युल्यानुसार नियुक्त्या होण्याची शक्यता आह़े संस्थानची आंतरराष्ट्रीय ख्याती बघता येथे वर्णी लागावी यासाठी अनेक जण राजकीय नेत्यांचे उंबरठे ङिाजवत आहेत़ अन्य पक्षांतील काही नेते संस्थानात येण्यासाठी भाजपाशी संधान बांधून असल्याचीही जोरदार चर्चा आह़े (प्रतिनिधी)