दहावी पास शिवसेना आमदार पाच वर्षात झाले डॉक्टर

By Admin | Updated: July 30, 2014 11:07 IST2014-07-30T10:41:29+5:302014-07-30T11:07:02+5:30

दहावी पास शिक्षण असलेले शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर हे अवघ्या पाच वर्षात डॉक्टर बनले असून त्यांच्या डॉक्टरकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

During the last five years, the Shiv Sena MLA got passed for 10th year | दहावी पास शिवसेना आमदार पाच वर्षात झाले डॉक्टर

दहावी पास शिवसेना आमदार पाच वर्षात झाले डॉक्टर

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. ३० - दहावी पास शिक्षण असलेले शिवसेनेचे दहीसरमधील आमदार विनोद घोसाळकर हे अवघ्या पाच वर्षात डॉक्टर झाले आहेत. घोसाळकर यांना ज्या शिक्षण संस्थेतून ही डॉक्टरकी मिळाली त्या संस्थेत अवघ्या ४८ हजारांत डॉक्टरकी दिली जात असल्याचे उघड झाल्याने घोसाळकर  डॉक्टरकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. तर कोलकाता येथील विद्यापीठाने तीन वर्षांपूर्वी मानद डॉक्टरकी प्रदान केली होती. फक्त याचा गवगवा केला नव्हता असे घोसाळकर यांनी म्हटले आहे. 
दहीसरमधून निवडून येणारे शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या जाहिरातींमध्ये स्वतःच्या नावापुढे डॉक्टर लावल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या. कोलकाता येथील इन्स्टिट्यूट ऑफ एज्यूकेशन रिसर्च आणि डेव्हलपमेंट या महाविद्यालयातून घोसाळकर यांना डॉक्टरकी मिळाली आहे. हे महाविद्यालय न्यू एज आंतरराष्ट्रीय विद्यापीठाशी संलग्न असल्याचे त्यांच्या संकेतस्थळावर म्हटले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार या विद्यापीठाकडून कोणताही थिसीस सादर न करताही पीएचडी मिळवता येते. यासाठी फक्त ४८ हजार ५०० रुपये मोजावे लागतात असा दावाही वृत्तात करण्यात आला आहे. त्यामुळे घोसाळकर यांच्या डॉक्टरकी विषयी शंका उपस्थित होत आहेत. 
घोसाळकर यांनी मात्र हा दावा फेटाळला आहे. साडे तीन वर्षांपूर्वी विद्यापीठाची काही मंडळी मला भेटली होती. माझ्या राजकीय आणि सामाजिक योगदानासाठी महाविद्यालयाने मला मानद डॉक्टरकी दिली होती असे घोसाळकर यांचे म्हणणे आहे. मात्र या महाविद्यालयाच्या संकेतस्थळाला भेट दिली असता हे महाविद्यालय आरोग्यसंबंधीत अभ्यासक्रम चालवत असल्याचे दिसते. यात सामाजिक विषयाशी संबंधीत अभ्यासक्रम दिसून आलेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील उमेदवार संजीव नाईक यांच्या डॉक्टरकीवरुन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली होती. आता स्वपक्षातील आमदाराच्या डॉक्टरकीवर शंका उपस्थित झाल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे. 

 

Web Title: During the last five years, the Shiv Sena MLA got passed for 10th year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.