शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

तरुणीची छेड काढणारे अटकेत, घटनेदरम्यानच ठाणे पोलिसांची तत्काळ मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 04:18 IST

पाळीव श्वानाला घराजवळच्या परिसरात फिरविणा-या एका २३ वर्षीय तरुणीची, किसननगर शिवाजीनगर भागात छेड काढणा-या चौघांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली. तिची छेड काढली जात असतानाच, तिने ठाणे शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिलेल्या माहितीवरून, अवघ्या काही मिनिटांमध्येच पोलिसांनी ही कारवाई केली.

ठाणे : पाळीव श्वानाला घराजवळच्या परिसरात फिरविणा-या एका २३ वर्षीय तरुणीची, किसननगर शिवाजीनगर भागात छेड काढणा-या चौघांपैकी दोघांना श्रीनगर पोलिसांनी अटक केली. तिची छेड काढली जात असतानाच, तिने ठाणे शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिलेल्या माहितीवरून, अवघ्या काही मिनिटांमध्येच पोलिसांनी ही कारवाई केली.अरबाज नियाज खान (१८, रा. कादरी मंजील, पडवळनगर, वागळे इस्टेट, ठाणे) याच्यासह अन्य एका १७ वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अरबाजसह चौघे जण शिवाजीनगर भाजी मार्केट ठाणे महापालिका शाळेकडे जाणा-या रस्त्यावर, या इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करणाºया तरुणीची सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास छेड काढली. आधी तिच्या कुत्र्याचे नाव विचारण्याचा बहाणा करीत तिचेही त्यांनी वारंवार नाव विचारले. नंतर तिच्यावर अश्लील शेरेबाजी करीत, तिला गराडा घालून चौघांनीही तिला पुढे मागे जाण्यास मज्जाव केला. त्याच वेळी तेथून जाणाºया एका मित्रालाही तिने हा प्रकार सांगितला. ती त्याच्या मदतीने पुढे जाऊ लागल्यानंतरही, त्यांनी तिचा पाठलाग करीत पुन्हा छेड काढणे सुरूच ठेवले. तिने अखेर ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाच्या १०० या क्रमांकावर संपर्क साधून या प्रकाराची तक्रार केली. त्यानंतर, श्रीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पंधारकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिनेश चव्हाण, पोलीस नाईक आर. आर. गार्डे, टी. टी. पोटेकर, कॉन्स्टेबल ए. बी. बावणे आणि वाय. सी. राठोड आदींच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन छेड काढणाºया चौकडीपैकी दोघांची धरपकड केली.पोलिसांची व्हॅन पाहून त्यातील उर्वरित दोघांनी मात्र पलायन केले. दरम्यान, अरबाज याची ठाणे न्यायालयाने १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर रविवारी सुटका केली, तर त्याचा साथीदार अल्पवयीन असल्यामुळे त्याला सोमवारी भिवंडीच्या बाल न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCrimeगुन्हा