शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारच्या काळात दलितांवरील अत्याचार वाढले, राजेंद्र गवई यांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 22:04 IST

भाजप सरकारच्या काळात राज्यात दलितांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. यात अहमदनगर जिल्हा आघाडीवर असल्याची टीका रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी मंगळवारी येथे पत्रपरिषदेतून केली.

अमरावती - कोरेगाव भीमा प्रकरण हे मराठा समाजाने पेटविले, असे मनुवादी प्रवृत्तीकडून जाणीवपूर्वकरीत्या पेरले जात आहे. मात्र, मराठा-बौद्ध असा हा वाद नाहीच. मराठा समाज गुन्हेगार असल्याचा एकही पुरावा नाही. मराठा विरुद्ध बौद्ध असा संघर्ष रंगविण्याचे षड्यंत्र या घटनेआडून सुरू असल्याची टीका रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी मंगळवारी येथे पत्रपरिषदेतून केली.भाजप सरकारच्या काळात राज्यातील आंबेडकर अनुयायांवरील अत्याचारांमध्ये दखलनीय वाढ झाली आहे. यात अहमदनगर जिल्हा आघाडीवर आहे, असे विधान त्यांनी केले. दंगलीमागे कुणाचा हात आहे, हे पोलिसांनी शोधून काढावे. संभाजी (मनोहर) भिडे, मिलिंद एकबोटे हे या घटनेमागे असल्याचा प्रकाश आंबेडकरांनी जो आरोप केला तो सत्य आहे, असा दुजोराही गवई यांनी दिला. कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर भारीप-बहुजप महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यात झालेल्या वाक्युद्धाच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र गवई यांनी रिपाइंची भूमिका मांडली. गवई यांच्या मते, आठवले आणि आंबेडकर हे दिग्गज नेते आहेत, यात दुमत नाही. मात्र, रिपाइं ऐक्यासाठी दोघांनीही पुढाकार घेतला तर ते स्वागतार्ह असेल. सूत्र कोणतेही असावे; पण रिपाइंचे ऐक्य ही काळाची गरज आहे. प्रकाश आंबेडकरांशिवाय ते ऐक्य नसेल, असेही गवई म्हणाले. कोरेगाव भीमाप्रकरणी राज्यभर बंद पुकारला. त्यानंतर काही ठिकाणी जाळपोळ, हिंसाचाराच्या घटना घडल्यात. हे कृत्य समाजकंटकांनी केले. यात रिपाइं कार्यकर्ता नव्हता, असे गवई यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी निरपराधांवर गुन्हे दाखल करून अन्यायकारक अटकसत्र चालविले आहे. अमरावतीत काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. याप्रकरणी आपण संबंधित व्यावसायिकांना भेटणार आहोत. रिपाइं हा समता प्रस्थापित करणारा पक्ष असून सलोख्यासाठी पुढाकार घेऊ, असे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला भाऊसाहेब ढंगारे, वसंतराव गवई, हिमंत ढोले, दीपक सरदार, उमेश इंगळे आदी उपस्थित होते.

रिपाइंची काँग्रेससोबत मैत्रीरिपाइं (गवई गट) हा काँग्रेससोबत राहील. येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष विचारसरणीची सोबत करण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून आपण स्वत: निवडणूक लढणार असल्याचे राजेंद्र गवई यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र