अपघातावेळी मीच गाडी चालवत होतो - सलमानच्या ड्रायव्हरची कबुली
By Admin | Updated: March 30, 2015 14:17 IST2015-03-30T14:13:59+5:302015-03-30T14:17:06+5:30
अपघाताच्या रात्री सलमान नव्हे तर आपण स्वत: गाडी चालवत होतो, अशी कबुली ड्रायव्हर अशोक सिंगने दिल्याने हिट अँड रन प्रकरणातून अभिनेता सलमान खानला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

अपघातावेळी मीच गाडी चालवत होतो - सलमानच्या ड्रायव्हरची कबुली
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - अपघाताच्या रात्री सलमान नव्हे तर आपण स्वत: गाडी चालवत होतो, अशी कबुली ड्रायव्हर अशोक सिंगने दिल्याने बेदरकारपणे गाडी चालवून फुटपाथवर झोपलेल्या नागरिकांना चिरडल्या प्रकरणातून अभिनेता सलमान खानला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वांद्रे येथे २००२ साली घडलेल्या हिट अँड रन प्रकरणाची सुनावणी पुन्हा सुरू झाली असून आज सलमानचा ड्रायव्हर अशोक सिंग याची साक्ष घेण्यात आली. तेव्हा त्याने आपणच गाडी चालवत असल्याचे कबूल केले. मी पोलिसांनाही तोच जबाब दिला होता, मात्र ते आपलं काहीही ऐकण्यास तयार नव्हते असेही सिंग यांनी म्हटले. दरम्यान सिंग यांच्या या कबुलीमुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची चिन्हे आहेत. २००२ साली घडलेल्या या अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी झाले होते.