दुर्गा शिरसाटचं नेत्रदीपक यश
By Admin | Updated: June 7, 2016 07:42 IST2016-06-07T07:42:18+5:302016-06-07T07:42:18+5:30
सुसंस्कृत डोंबिवली शहरातील साउथ इंडियन शाळेच्या दुर्गा शिरसाट हिने संस्कृत विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवत शंभर नंबरी यश मिळवले

दुर्गा शिरसाटचं नेत्रदीपक यश
जान्हवी मौर्ये,
डोंबिवली- सुसंस्कृत डोंबिवली शहरातील साउथ इंडियन शाळेच्या दुर्गा शिरसाट हिने संस्कृत विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवत शंभर नंबरी यश मिळवले आहे. त्याचबरोबर तिने सर्व विषयांत एकूण ९६.८० टक्क्यांसह शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तिच्या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दुर्गाचे वडील विठ्ठल हे एका फार्मासिटीकल कंपनीत कामाला आहेत, तर आई गृहिणी आहे. दुर्गा कोपर परिसरातील शंकर कृपा इमारतीत राहते. तिने दहावीसाठी संस्कृतव्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयाला क्लास लावला नव्हता. अभ्यास करताना तिला कोणतीही अडचण आली नाही. तिने अभ्यासासाठी अशी ठरावीक वेळ ठरवलेली नव्हती. मनाला वाटेल तेव्हा अभ्यास केला. वाटेल तेव्हा ब्रेक घेतला. त्यामुळे मनावर अभ्यासाचा ताण नव्हता. पालकांनीही अभ्यासासाठी तिच्यावर कोणताही दबाव आणला नव्हता. त्यामुळेच तिने चांगले गुण मिळवले, असे त्यांनी सांगितले. तिला शाळेतील शिक्षक, पालक आणि मित्रमैत्रिणींचे सहकार्य मिळाले. हिंदीऐवजीे संस्कृत विषय निवडला. मात्र, पाठांतरावर जोर दिला नाही. विषय समजून घेत अभ्यास केल्याने हे शंभर नंबरी यश संपादन करता आले, असे दुर्गाने ‘लोकमत’ला सांगितले.