कनिष्ठ वेतन श्रेणीचा कालावधी १ वर्षावर
By Admin | Updated: April 8, 2017 05:20 IST2017-04-08T05:20:33+5:302017-04-08T05:20:33+5:30
एसटी महामंडळात नव्याने रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्याला तीन वर्ष कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करावे लागत होते

कनिष्ठ वेतन श्रेणीचा कालावधी १ वर्षावर
मुंबई : एसटी महामंडळात नव्याने रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्याला तीन वर्ष कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करावे लागत होते. त्यामुळे अशा कर्मचाऱ्याला वाढीव वेतनश्रेणीचा लाभ हा थेट ३ वर्षानंतरच मिळत होता. परंतु आता हा कालावधी कमी करुन तो एक वर्षापर्यंत करण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांनी विधीमंडळात दिली.
सध्या एसटी महामंडळात १ लाख १0 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यातील १२ हजार ५१४ कर्मचारी कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करत आहेत. त्यांना याचा लाभ मिळेल.
पहिल्या सहा महिन्यानंतर कनिष्ठ कर्मचाऱ्याला ५00 रुपये वेतनवाढ देण्यात येईल.
तर वर्षभर समाधानकारकाम केल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला पुढील वर्षापासून नियमित वेतनश्रेणीचा लाभ देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
महत्वाची बाब म्हणजे एसटीत नव्याने भरती होणाऱ्या १४ हजार कर्मचाऱ्यांनाही त्याचा फायदा होईल. २000 सालापासून नव्याने
भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान पाच वर्ष कनिष्ठ वेतनश्रेणीमध्ये
काम करावे लागत होते. (प्रतिनिधी)
>संघटनांची मागणी
२0१२-१६ च्या वेतन करारामध्ये हा कालावधी ५ वर्षावरुन ३ वर्ष करण्यात आला. याबाबतही एसटी कामगार संघटनांकडून तीन वर्षाचा कालावधी कमी करण्याची विनंती एसटी महामंडळाला केली होती. ही मागणी लक्षात घेता कालावधी कमी करण्यात आला.