नागपुरात दुहेरी हत्याकांड
By Admin | Updated: April 30, 2016 14:06 IST2016-04-30T14:06:58+5:302016-04-30T14:06:58+5:30
खामला परिसरातील शिवनगरात दोन तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे

नागपुरात दुहेरी हत्याकांड
>ऑनलाइन लोकमत -
नागपूर, दि. 30 - शहरात दुहेरी हत्याकांड झाल्याने खळबळ उडाली आहे. खामला परिसरातील शिवनगरात दोन तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अविनाश (23) आणि कुलदीप (17 वर्ष) अशी हत्या झालेल्या तरुणांची नावं आहेत. एका पडक्या इमारतीजवळ या दोघांचे मृतदेह आढळले असून हत्येचं कारण स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. यातील चार संशयित अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे.