डम्परची बाईकला भीषण धडक, पितापुत्रीचा जागीच मृत्यू
By Admin | Updated: February 20, 2017 12:42 IST2017-02-20T12:42:56+5:302017-02-20T12:42:56+5:30
कोल्हापुरात बाईक आणि डम्परच्या झालेल्या धडकेत भीषण अपघात झाला. या अपघातात पितापुत्रीचा जागीच मृत्यू झाला.

डम्परची बाईकला भीषण धडक, पितापुत्रीचा जागीच मृत्यू
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 20 - शिरोळ येथील उदगांव-चिंचवाड मार्गावर असलेल्या पेंविग कारखान्यासमोर बाईक आणि डम्परच्या झालेल्या धडकेत भीषण अपघात झाला. या अपघातात दादासो वनखंडे (वय 26 )व तृप्ती वनखंडे (वय 3) या पितापुत्रीचा जागीच मृत्यू झाला.
सोमवारी सकाळी 10.30 वाजता ही घटना घडली. दरम्यान घटनेनंतर संतप्त जमावाने डम्पर पेटवला. सोमवारी सकाळी दादासो वनखंडे हे आपल्या मुलीला घेऊन चिंचवाडहून उदगांवकडे येत होते. यावेळी भरधाव येणा-या डम्परने त्यांच्या बाईकला धडक दिली.
यात दादासो आणि त्यांची मुलगी तृप्ती दोघंही बाईकवरुन खाली पडले आणि अंगावरुन डम्पर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर डम्परचालकाने पळ काढला, मात्र नागरिकांनी त्याचा पाठलाग करुन उदगांव टोल नाका येथे त्याला डम्परसहीत अडवले.