राखीव मैदानाचे झाले डम्पिंग ग्राउंड
By Admin | Updated: June 8, 2016 01:56 IST2016-06-08T01:56:27+5:302016-06-08T01:56:27+5:30
गोराई परिसरात खेळासाठी राखीव असलेल्या मैदानावर बेकायदेशीररीत्या गाड्यांमधून आणलेल्या गाळ टाकला जात आहे.

राखीव मैदानाचे झाले डम्पिंग ग्राउंड
मुंबई : गोराई परिसरात खेळासाठी राखीव असलेल्या मैदानावर बेकायदेशीररीत्या गाड्यांमधून आणलेल्या गाळ टाकला जात आहे. त्यामुळे स्थानिकांना याचा नाहक फटका बसत आहे. याविरोधात संतप्त गोराईकरांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बोरीवली पश्चिमेच्या एल. टी. रोड, गोराई क्रमांक ३ तसेच गोराई डेपोजवळील इमारतीत गेल्या तीन वर्षांपासून स्थानिक मोहीम सुरू आहे. ज्यात चिन्मय, सी वूड, वैष्णवी आणि मंगलमूर्ती या इमारतींचा समावेश आहे. शेट्टी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्याभरापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सुमारे २०० ट्रक कचरा या परिसरात खेळासाठी राखीव असलेल्या मैदानात टाकण्यात आला. ज्यात नालेसफाईतून निघालेला गाळ, लाकूड, प्लास्टीक तसेच सुक्या कचऱ्याचा समावेश आहे.
स्थनिकांनी पालिकेकडे तक्रार केली असता, शहरात सध्या साफसफाईची कामे चालू आहेत. त्यामुळे दररोज ठाणे किंवा कांजूरमार्ग येथे कचरा टाकणे कठीण आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात या मैदानाचा वापर करण्यात येत आहे. जो तातडीने उचलला जाणार असल्याचे आश्वासन पालिकेकडून देण्यात आले. मात्र अद्याप हा गाळ या ठिकाणी पडून आहे. ज्याचा स्थानिकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आहे. त्यानुसार आता आठ दिवसांत जर हा गाळ उचलला गेला नाही, तर गोराईकरांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)
तात्पुरत्या स्वरूपात या मैदानाचा वापर करण्यात येत आहे. जो तातडीने उचलला जाणार असल्याचे आश्वासन पालिकेकडून देण्यात आले. मात्र अद्याप हा गाळ या ठिकाणी पडून आहे. ज्याचा स्थानिकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आहे.