मुलुंडमध्ये डंपिंग ग्राऊंडला भीषण आग
By Admin | Updated: April 11, 2016 16:00 IST2016-04-11T13:46:58+5:302016-04-11T16:00:55+5:30
सोमवारी सकाळी मुलुंड पूर्वेकडील डंपिंग ग्राऊंडला भीषण आग लागली.

मुलुंडमध्ये डंपिंग ग्राऊंडला भीषण आग
>ऑनलाइन लोकमत
मुलुंड, दि. ११ - मुलुंड पूर्वेकडील हरी ओमनगरमधील डंपिंग ग्राऊंडमध्ये सोमवारी सकाळी आग लागली आहे. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर झाला असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळा येत आहे. ठाणे आणि मुलुंड च्या मधे असलेल्या हरी ओमनगर येथील कच-याच्या डंपिंग ग्राउंडला आज सकाळी मोठी आग लागली.
मुंबईतून रोज तब्बल 10 हजार टन कचरा जमा केला जातो जो देवनार, मुलुंड आणि कांजूरमार्गमधील डंपिंग ग्राऊंडमध्ये टाकला जातो. कांजूरमार्गमधील डंपिंग ग्राऊंडवरील आगीचा मुद्दा अजूनही चर्चेत असताना मुलुंडमध्ये लागलेल्या आगीमुळे पुन्हा एकदा डंपिंग ग्राऊंडचा विषय ऐरणीवर आला आहे. ( फोटो : विशाल हळदे)