बोअरवेलमध्ये अडकून मृत्यू

By Admin | Updated: April 7, 2016 02:16 IST2016-04-07T02:16:11+5:302016-04-07T02:16:11+5:30

विहिरीत आडवे बोअरवेल सुरू असताना, पाइपमध्ये कपडे अडकल्याने काही कळण्याच्या आतच रोजंदारीवरील शेतकऱ्याचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला

Dump into the borewell | बोअरवेलमध्ये अडकून मृत्यू

बोअरवेलमध्ये अडकून मृत्यू

नाशिक : विहिरीत आडवे बोअरवेल सुरू असताना, पाइपमध्ये कपडे अडकल्याने काही कळण्याच्या आतच रोजंदारीवरील शेतकऱ्याचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी येथे घडली.
प्रकाश शेलार (४०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. वसंत बागुल यांच्या विहिरीवर आडवे बोअरवेल करण्याचे काम बुधवारी सुरू होते. दुष्काळी स्थितीमुळे प्रकाश शेलार बोअरवेलवर रोजंदारीने कामाला होते. पहाटे आडव्या बोअरवेलचे पाइप जोडण्यासाठी शेलार विहिरीत उतरले होते, तर त्यांचा दुसरा साथीदार विहिरीवर मशिन आॅपरेट करीत होता. एक पाइप संपूर्ण जमिनीत गेल्याने दुसरा पाइप जोडण्याचे काम करत असतानाच, शेलार यांचे कपडे दोन्ही पाइप्समध्ये अडकले. त्यांना काही समजण्याच्या आत ते अतिवेगाने पाइपमध्ये अडकले. त्यांचा एक हात काही क्षणात कापला गेला व त्यानंतर निम्म्याहून अधिक शरीराचा भाग फिरत असलेल्या पाइपमध्ये अडकून त्यांचा जागीच मृत्यू झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Dump into the borewell