दिल्ली प्रचारात ‘डमी’ अण्णा हजारे
By Admin | Updated: February 4, 2015 02:19 IST2015-02-04T02:19:13+5:302015-02-04T02:19:13+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासारख्याच दिसणाऱ्या व्यक्तीचा प्रचारात वापर केला जात आहे

दिल्ली प्रचारात ‘डमी’ अण्णा हजारे
पारनेर (अहमदनगर) : दिल्ली विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासारख्याच दिसणाऱ्या व्यक्तीचा प्रचारात वापर केला जात असून, याबाबत दिल्लीतील कार्यकर्त्यांनी हजारे यांच्याकडे तक्रार केली असल्याचे समजते.
अरविंद केजरीवाल यांच्या ‘आम आदमी पार्टी’ कडून अशा पद्धतीने कृती होत असल्याने हजारे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे़ दिल्ली विधानसभेची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. जनलोकपाल आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण देशभर आपला ठसा उमटविणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे तत्कालिन सहकारी अरविंद केजरीवाल यांनी राजकारणात प्रवेश केला़ केजरीवालांच्या राजकारण प्रवेशाने हजारे व केजरीवाल यांच्यात दरी निर्माण झाली. सध्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत अण्णा हजारे यांच्या विचारांचा मोठा पगडा मतदारांवर आहे़ निवडणुकीत मतदार आकर्षित व्हावेत, या हेतूने केजरीवाल यांच्या कार्यकर्त्यांनी अण्णांसारखी दिसणारी एक व्यक्ती प्रचारात उतरविली आहे. दिल्लीतील हजारे समर्थकांनी राळेगणसिध्दीत त्याचे काही फोटो आहे़‘आप’ कडून अशाप्रकारे होणारा अण्णांचा वापर थांबवावा, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)