मजेसाठी स्पोर्ट्स बाईक चोरणाऱ्या ड्यूक गॅंगला अटक

By Admin | Updated: October 25, 2016 16:26 IST2016-10-25T16:08:31+5:302016-10-25T16:26:20+5:30

मैत्रिणींना फिरविण्यासाठी स्पोर्ट्स बाईक चोरणाऱ्या 3 जणांच्या ड्यूक गॅंगला पुणे पोलिसांनी अटक केली.

Duke gang arrested for sport bike for fun | मजेसाठी स्पोर्ट्स बाईक चोरणाऱ्या ड्यूक गॅंगला अटक

मजेसाठी स्पोर्ट्स बाईक चोरणाऱ्या ड्यूक गॅंगला अटक

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २५ -  मैत्रिणींना फिरविण्यासाठी स्पोर्ट्स बाईक चोरणाऱ्या 3 जणांच्या ड्यूक गॅंगला फरासखाना पोलिसानी अटक केली. प्रथमेश गवळी, प्रीतम गांजवे, रोहन विधाते अशी त्यांची नावे असून ते 19 वर्षांचे आहेत.
 त्यांच्याकडून 4 के टी एम, 3 बुलेट, इतर 3 अशा 10 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस उपयुक्त सुधीर हिरेमठ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंखे यांनी दिली. 

गर्दीच्या ठिकाणी पार्क केलेल्या गाड्या हेरून शक्यतो नवीन गाड्या डुप्लिकेट चावी वापरून ते चोरून नेत. नंतर मित्रांना वापरायला देत, त्यांनी नातेवाईकांच्याही गाड्या विकल्या होत्या. 

Web Title: Duke gang arrested for sport bike for fun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.