छोटे कपडे घातल्याने अभिनेत्री गौहर खानच्या श्रीमुखात लगावली
By Admin | Updated: December 1, 2014 15:20 IST2014-12-01T11:25:57+5:302014-12-01T15:20:03+5:30
मुसलमान असूनही छोटे कपडे घालत असल्याचे सांगत एका माथेफिरु प्रेक्षकाने अभिनेत्री गौहर खानच्या श्रीमुखात लगावल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली.

छोटे कपडे घातल्याने अभिनेत्री गौहर खानच्या श्रीमुखात लगावली
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - मुसलमान असूनही छोटे कपडे घालत असल्याचे सांगत एका माथेफिरु प्रेक्षकाने अभिनेत्री गौहर खानच्या श्रीमुखात लगावल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. या घटनेनंतर सेटवर उपस्थित कर्मचा-यांनी त्या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
गोरेगावमधील फिल्म सिटीत रविवारी संध्याकाळी एका रिअॅलिटी शोचे शुटिंग सुरु होते. या शोची अँकर आणि अभिनेत्री गौहर खानला ब्रेक दरम्यान अकिल मलिक (वय २४ वर्ष) या तरुणाने श्रीमुखात लगावली. 'मुसलमान असूनही छोटे कपडे घालणे व घाणेरड्या गाण्यांवर नृत्य करणे शोभते का' असा सवालही मलिकने गौहरला विचारला. क्षणभर या प्रकाराने सेटवर उपस्थित सर्व जण अवाक झाले. मात्र त्यानंकर सेटवरील कर्मचारी व सुरक्षा रक्षकांनी अकिल मलिकला पकडले व गोरेगाव पोलिसांच्या हवाली केले. अकिल हा गौहरच्या छोटे कपडे घालण्यावर नाराज होता व या रागातूनच त्याने तिला मारल्याचे पोलिस चौकशीतून समोर आले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मलिकने गौहरशी असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्नही केला. याप्रकरणी गौहरने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.