‘अँडव्हान्टेज विदर्भ-२’वर अनिश्‍चिततेचे सावट

By Admin | Updated: May 22, 2014 02:09 IST2014-05-22T02:09:48+5:302014-05-22T02:09:48+5:30

विदर्भाच्या विकासाला चालना देण्यासाठी गेल्या वर्षी मोठा गाजावाजा करून घेण्यात आलेली ‘अँडव्हान्टेज विदर्भ’

Due to uncertainty on'Advantage Vidarbha-2 ' | ‘अँडव्हान्टेज विदर्भ-२’वर अनिश्‍चिततेचे सावट

‘अँडव्हान्टेज विदर्भ-२’वर अनिश्‍चिततेचे सावट

नागपूर : विदर्भाच्या विकासाला चालना देण्यासाठी गेल्या वर्षी मोठा गाजावाजा करून घेण्यात आलेली

२0१३ मध्ये फेब्रुवारी महिन्यात अँडव्हान्टेज विदर्भ नागपुरात थाटामाटात घेण्यात आले. दोन दिवस चाललेल्या देशभरातील ४४0 गुंतवणूकदारांच्या महामेळ्यात १४,५३४ कोटी रुपयांचे २७ करार करण्यात आले होते. खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दोन दिवस नागपुरात ठाण मांडून बसले होते. परिषदेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून त्यांनी दरवर्षी अशाप्रकारची परिषद नागपुरात आयोजित करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे २0१४ च्या सुरुवातीपासूनच

आता निवडणुका आटोपल्या. पण निकालामुळे राज्यातील राजकीय चित्रच पालटले. ज्या उद्योग खात्याकडे ही परिषद आयोजित करण्याची जबाबदारी होती, त्या खात्याचे मंत्री नारायण राणे यांनीच त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. ज्यांच्या पुढाकाराने ही परिषद आयोजित केली जाणार होती ते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राज्यातील काँग्रेसच्या पराभवामुळे अडचणीत सापडले. ज्यांनी अँडव्हान्टेज विदर्भ घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती ते नागपूरचे पालकमंत्रीसुद्धा यवतमाळातून पराभूत झाले आहेत. त्यामुळे

विदर्भात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात जून माहिन्यात निवडणुका आहेत. आचारसंहिता लागू झाली आहे. पुढच्या काही महिन्यात राज्य विधानसभेच्या निवडणुका आहेत. ही सर्व पार्श्‍वभूमी लक्षात घेतली तर यंदा

अँडव्हान्टेज विदर्भही गुंतवणूकदारांची परिषद यंदा होण्याची शक्यता धूसर आहे. निवडणूक आचारसंहिता आणि राज्यातील राजकीय अस्थिरतेच्या कारणामुळे त्यावर अनिश्‍चिततेचे सावट आले आहे.अँडव्हान्टेज विदर्भ-२च्या आयोजनाकडे उद्योजकांचे आणि वैदर्भीयांचेही लक्ष लागले होते. सुरुवातीला लोकसभा निवडणुकीच्या आधी म्हणजे फेब्रुवारी महिन्यातच ही परिषद घेण्याचे नियोजन होते. पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चाही केली होती. पण नंतर निर्णय बदलला. निवडणुकीनंतर घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी नागपुरातच सहकार खात्याच्या कार्यक्रमात जाहीर केले होते. अँडव्हान्टेज विदर्भ-२वर सध्या तरी अनिश्‍चिततेचे सावट आहे.अँडव्हान्टेज विदर्भ-२ला मुहूर्त सापडणे कठीण आहे. यासंदर्भात पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलू, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Due to uncertainty on'Advantage Vidarbha-2 '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.