शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

एकनाथ शिंदेंच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे छ. शिवरायांची प्रतिमा खाली पडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 08:25 IST

राज्यातील या घडामोडीत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे यांना भाजपानं ताकद दिली. शिंदे गट आणि भाजपा यांचे सरकार राज्यात स्थापन झाले.

मुंबई - विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप घडला. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे अचानक नॉट रिचेबल झाले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे काही आमदारही असल्याचं बोललं गेले. त्यानंतर राजकीय सत्तानाट्यात शिंदे यांची बंडखोरी समोर आली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल ४० आमदार गेल्यानंतर राज्यातील मविआ सरकार अल्पमतात आले आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावं लागलं. 

राज्यातील या घडामोडीत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे यांना भाजपानं ताकद दिली. शिंदे गट आणि भाजपा यांचे सरकार राज्यात स्थापन झाले. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून शक्तिप्रदर्शन करत विविध मेळावे आयोजित करत आहेत. शिंदे गटातील आमदार कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित करत आहेत. यात मध्यरात्री उशिरापर्यंत हे मेळावे चालतात. रविवारी जळगावच्या पाचोरा येथील भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. 

या मेळाव्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. परंतु मेळावा संपल्यानंतर काही अतिउत्साही कार्यकर्ते व्यासपीठावर पोहचले. त्याठिकाणी मोठी गर्दी झाल्याने काहीसा गोंधळ झाला. त्यातच गर्दीमुळे व्यासपीठावर असणाऱ्या महापुरुषांची प्रतिमा खाली पडली. ही घटना कार्यकर्त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेक शिवप्रेमी संताप व्यक्त करत आहेत. 

या घटनेचा व्हिडिओ राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. मिटकरी यांनी म्हटलं आहे की, राजकारण करा पण महापुरुषांचा असा अनादर होत असेल तर ते जनता सहन करु शकणार नाही असं त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात शिंदे गटातील आमदार कार्यकर्त्यांना मुंबईत घेऊन येत शक्तिप्रदर्शन करत आहेत. एकीकडे राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहेत तर दुसरीकडे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू असल्याचं दिसून येत आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस