शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमधील खदखद बाहेर! आशिष देशमुख राजीनामा देणार; पक्षातंर्गत नाराजी उफाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 11:35 IST

इम्रान प्रतापगढी हे कव्वाल, शायर असून शिर्डीत होणाऱ्या नव संकल्प शिबिरात त्यांचे कव्वालीचे कार्यक्रम ठेवा असा खोचक टोलाही आशिष देशमुख यांनी स्वपक्षाला दिला आहे.

नागपूर - राज्यसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील खदखद अखेर बाहेर पडली आहे. काँग्रेसनं महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगढी(Imran Pratapgadhi) यांना उमेदवारी दिल्याने पक्षात अनेक जण नाराज असल्याचं समोर आलं. काँग्रेस नेत्या नगमा यांनी १८ वर्षाची तपस्या कमी पडली अशा शब्दात नाराजी व्यक्त केली. आता काँग्रेसचे प्रदेश महासचिव माजी आमदार आशिष देशमुख यांनी राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीतील नाराजी उफाळून आल्याचं चित्र काँग्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. 

डॉ. आशिष देशमुख(Dr Ashish Deshmukh) काँग्रेसमध्ये पदाचा राजीनामा देत असले तरी पक्षात राहून काम करणार असल्याचं त्यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्रात अनेक सक्षम उमेदवार असताना पक्षाने राज्याबाहेरचा उमेदवार दिल्याने ही नाराजी आहे. भाजपातून बाहेर पडल्यानंतर देशमुखांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यासाठी त्यांनी आमदारकीही पणाला लावली. खुद्द पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशमुखांना राज्यसभेच्या जागेचं आश्वासन दिले होते मात्र ते पाळलं नाही असा दावा त्यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. 

इतकेच नाही तर इम्रान प्रतापगढी हे कव्वाल, शायर असून शिर्डीत होणाऱ्या नव संकल्प शिबिरात त्यांचे कव्वालीचे कार्यक्रम ठेवा असा खोचक टोलाही आशिष देशमुख यांनी स्वपक्षाला दिला आहे. दरम्यान पदाचा राजीनामा देत असलो तरी पक्ष सोडणार नाही असंही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. राज्यात राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा १ उमेदवार निवडून येऊ शकतो. या जागेसाठी काँग्रेसमध्ये राज्यातील अनेकजण इच्छुक होते. परंतु त्या सगळ्यांना डावलून पक्षाने बाहेरील राज्यातील उमेदवार दिला. काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांना पक्षाने उमेदवारी दिली. 

अखेरच्या क्षणी बदलला महाराष्ट्रातील राज्यसभा उमेदवारकाँग्रेस एका अल्पसंख्याक नेत्याला राज्यसभेत पाठवू इच्छित होती. यात गुलाम नबी आझाद आणि इम्रान प्रतापगढी यांची नावे चर्चेत होती. आझाद यांना महाराष्ट्रातून उमेदवार बनविण्यावर सहमती झाली होती. अखेर प्रियांका गांधी यांच्या हस्तक्षेपानंतर इम्रान प्रतापगढी यांना महाराष्ट्रातून उमेदवार बनविण्यात आले. महाराष्ट्रातील नेत्यांनी प्रभारी एच. के. पाटील यांना फोन करून या निर्णयाला विरोध केला होता. 

उत्तर प्रदेशातील प्रख्यात उर्दू कवी इम्रान प्रतापगढी यांना काँग्रेसमधून पाठिंब्याचे बळ अन् नाराजीची झळही सोसावी लागत असल्याचे चित्र आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी इम्रान यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. एका राज्यातील नेते दुसऱ्या राज्यातून राज्यसभेवर जातात यात नवीन काहीही नाही. आपले मुकुल वासनिक राजस्थानमधून उमेदवार आहेत. इम्रान प्रतापगढी हे तरुण, उत्साही आहेत, आम्ही सगळे त्यांना निश्चितपणे निवडून आणू, असे दोघांनीही ठामपणे सांगितले.  

टॅग्स :congressकाँग्रेसAshish Deshmukhआशीष देशमुखRajya Sabhaराज्यसभा