शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील आरोग्य मित्र न्यायाच्या प्रतीक्षेत, बुधवारपासून संपावर जाणार; नेमक्या मागण्या काय..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 12:20 IST

बैठक बोलावण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आश्वासन : प्रश्न मार्गी लागल्यास आंदोलन मागे

कोल्हापूर : महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि पंतप्रधान जनआरोग्य योजनेचे काम करणाऱ्या आरोग्य मित्रांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे राज्यातील आरोग्य मित्र बुधवार, दि. १२ फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती डॉ. डी. एल. कराड यांनी दिली.सीआयटीयू संलग्न असलेल्या आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेने १८ जानेवारीला राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलनाचे पत्र दिले होते. आरोग्य मित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे सचिव किरण ढमढेरे यांनी एमआरटीयू आणि पीयूएलपी कायद्याचे कलम २४ (१) मधील तरतुदीनुसार १२ फेब्रुवारीपासून राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार आहेत. राज्य आरोग्य हमी सोसायटीला आणि सहायक संस्थांना कायदेशीर २१ दिवसांची नोटीसही दिली आहे. या कालावधीत जर आरोग्यमित्रांच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर मदत काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.

पूर्वी झालेल्या बैठकीत आरोग्य मित्रांची वेतनवाढ आणि इतर समस्यांसंदर्भात सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली होती. त्याचवेळी राज्य आरोग्य सोसायटीने आचारसंहितेपूर्वी आरोग्य मित्रांच्या सर्व मागण्या पूर्ण करू असे आश्वासन दिले होते. मात्र, निवडणुका होऊन गेल्या तरी निर्णय न झाल्याने आरोग्यमित्र आक्रमक झाले आहेत. -गणेश पाटील, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा आरोग्यमित्र संघटना

संपापूर्वीच बैठक शक्यदरम्यान, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी अध्यक्ष डॉ. कराड यांनी २ फेब्रुवारी रोजी संपाबाबत चर्चा केली होती. यात टीपीए आणि राज्य आरोग्य हमी सोसायटीसोबत एक बैठक बालावण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे. आरोग्य मित्रांना न्याय देण्यासाठी संपापूर्वीच ही बैठक होण्याची शक्यता आहे.

आरोग्य मित्रांच्या प्रमुख मागण्याकिमान वेतन कायद्यानुसार २६ हजार खास भत्ता, महागाई भत्ता, तसेच पेट्रोल भत्ता मिळावा.दरवर्षी १० टक्के वेतनवाढ व्हावी, नियमानुसार आणि कायदेशीर रजा द्याव्यात

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHealthआरोग्यStrikeसंप