शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपन्यांमुळे बळीराजा वाऱ्यावर, भरपाईत अडवणूक! ३७ लाख बाधितांपैकी केवळ ३ लाख शेतकऱ्यांना दिली भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 06:24 IST

खरीप हंगामातील पीकविमा प्रकरणात काही विमा कंपन्यांनी विम्याची भरपाई रक्कम देण्यापासून हात आखडता घेतला असल्याचे समोर आले आहे.

मुंबई/औरंगाबाद :

खरीप हंगामातील पीकविमा प्रकरणात काही विमा कंपन्यांनी विम्याची भरपाई रक्कम देण्यापासून हात आखडता घेतला असल्याचे समोर आले आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या आकडेवारीनुसार सध्याच्या घडीला ३७ लाख २ हजार शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई देय आहे. ही रक्कम १७९२ कोटी रुपये इतकी आहे. मात्र, आतापर्यंत यातील केवळ ३ लाख शेतकऱ्यांना ९६.५३ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे.  राज्यात ३७ लाख २ हजार पीक विमा अर्जांपैकी १७ लाख २५ हजार अर्जांची नुकसानभरपाईची रक्कम निश्चित करण्यात आली असून, ती १०७४ कोटी रुपये आहे. 

१९ लाख ७७ हजार अर्जांची नुकसान भरपाई रक्कम निश्चित करण्यात आलेली नाही. एकूण १६ जिल्ह्यांनी अधिसूचना निर्गमित केल्या आहेत. त्यापैकी अकोला, अमरावती, सोलापूर जिल्ह्यांत विमा कंपन्यांनी आक्षेप घेतले आहेत.  ५ लाख २१ हजार दाव्यांचे सर्वेक्षण रेंगाळले- शेतकऱ्यांच्या नुकसानीचे एक हजार ७४ कोटी रुपयांपर्यंतचे दावे पीकविमा कंपन्यांच्या कचाट्यात अडकले आहेत. अद्याप नुकसानीचे पूर्ण सर्वेक्षणच कंपन्यांनी केलेले नाही. सुमारे पाच लाख २१ हजार दाव्यांचे सर्वेक्षण रेंगाळले असून पीकविमा कंपन्या त्यासाठी चालढकल करत आहेत. - स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत ५१ लाख ३१ हजारपैकी  ४६ लाख ९ हजार दाव्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. अद्यापही ५ लाख २१ हजार दाव्यांचे नुकसान सर्वेक्षण बाकी आहे. 

‘लोकमत’ने लक्ष वेधल्यानंतर कृषी खात्याला जाग राज्यात पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याबाबत ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते. पीक विम्याचा प्रीमियम आणि त्या मोबदल्यात दिली जाणारी तोकडी भरपाई या संदर्भात ‘लोकमत’ने सातत्याने बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्यानंतर आता कृषी विभाग खडबडून जागा झाला आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पीक विम्यासंदर्भात आढावा बैठक घेतली.  आठ दिवसांत शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आदेश पीक विम्यापासून राज्यातील एकही बाधित शेतकरी वंचित राहता कामा नये, अशा सूचना कृषी विभागाचे अधिकारी आणि विमा कंपन्यांना या बैठकीत देण्यात दिल्या.  विम्याचे प्रलंबित दावे पाच दिवसांत निकाली काढून आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्याचे आदेश कृषिमंत्री सत्तार यांनी या बैठकीत दिले. यात हलगर्जी झाल्यास कारवाईचा इशाराही विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला. 

या बैठकीला कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी विभागाचे मुख्य सांख्यिकी अधिकारी विजयकुमार आवटे, विभागीय व्यवस्थापक शकुंतला शेट्टी, गिरीजेश शर्मा, समीर सावंत, भरत कारभारी, एच. आर. गंगवाल तसेच कृषी विभागाचे प्रमुख अधिकारी व विमा कंपनीचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना नुकसानभरपाईकंपनीचे नाव    निश्चित     वाटप     प्रलंबित एचडीएफसी-ईआरजीओ    १२९.६    ११६.६१    ७.९२ एआयसी    ९५६.४९     ९.९    ९४६.५९ आयसीआयसीआय-लोंबार्ड    ११३.०४    ७०.५३    ४१.५५ युनायडेट इंडिया    ५२०.०८    ००    ५२०.०८ बजाज अलायन्झ    ७२.३२    ७१.८४    ००

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र