स्वभावातल्या 'या' दुर्गुणांमुळे स्त्रिया पुरुषांपासून दुरावतात

By Admin | Updated: October 20, 2016 14:16 IST2016-10-20T12:55:42+5:302016-10-20T14:16:08+5:30

स्त्री-पुरुषामध्ये चांगले, सकस नाते तयार होण्यामध्ये विचारांची भूमिका खूप महत्वाची ठरते. स्त्री-पुरुषामधले हे नाते नवरा-बायकोपुरतेच फक्त मर्यादीत नसते.

Due to these 'bad qualities', women are separated from men due to maladies | स्वभावातल्या 'या' दुर्गुणांमुळे स्त्रिया पुरुषांपासून दुरावतात

स्वभावातल्या 'या' दुर्गुणांमुळे स्त्रिया पुरुषांपासून दुरावतात

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २० - स्त्री-पुरुषामध्ये चांगले, सकस नाते तयार होण्यामध्ये विचारांची भूमिका खूप महत्वाची ठरते. स्त्री-पुरुषामधले हे नाते नवरा-बायकोपुरतेच फक्त मर्यादीत नसते तर, त्यामध्ये मैत्री, सहकारी ही सुद्धा नाती असतात. नोकरी किंवा अन्य ठिकाणी महिला पुरुषांच्या स्वभावामधल्या काही गोष्टी हेरतात त्यावरुनच स्त्रिया संबंधित पुरुषाबरोबर मैत्री, सहकार्याची भावना वाढवायची की नाही त्याचा निर्णय घेतात. 
 
पुरुषांच्या स्वभावामध्ये या गोष्टी दिसल्या तर महिला त्या पुरुषांना टाळतात. 
 
- जे पुरुष जाहीरपणे स्त्रियांबद्दल मनातील असलेली अढी दाखवून देतात. संपूर्ण स्त्री जातीबद्दल नकारात्मक भावना ठेवतात. वारंवार त्यांच्या बोलण्यातून स्त्रियाबद्दलचा व्देष, नकारात्मक भावना व्यक्त होते अशा पुरुषांपासून चार हात दूर रहाणेच स्त्रिया पसंत करतात. 
 
- पुरुष स्त्रियांच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करुन त्यांना एखादी गोष्ट करण्यापासून रोखतात. हेच कर ते करु नको असे सल्ले देतात ते पुरुषा महिलांना फारसे आवडत नाहीत. 
 
- ज्या पुरुषांना प्रत्येक संवादाला वादविवादामध्ये बदलण्याची सवय असते. प्रेयसी किंवा पत्नीला फिरायला बाहेर घेऊन गेल्यानंतर त्यांना डेटवर न येता वाद करण्यासाठी आपण बाहेर आलो आहोत असे जेव्हा स्त्रियांना वाटते तेव्हा त्यांचा हिरमोड होतो. 
 
- स्त्रिला वेळ देणारा तिच्यावर खर्च करणारा पुरुष आवडतो. पण जेव्हा प्रेयसी किंवा पत्नीसमोर प्रत्येकवेळी खर्चाचे कारण पुढे केले जाते तेव्हा स्त्रिया वैतागतात. 
 
- प्रेयसी किंवा पत्नीसोबत असताना जे पुरुष जाहीरपणे दुस-या स्त्रीबद्दलचे आकर्षण व्यक्त करतात ते महिलांना जास्त खटकते. 
 
- ज्या पुरुषांच्या मनात अहंकाराची भावना असते, आपली निष्ठूरता ते दाखवून देतात अशा पुरुषांबरोबर बोलायलाही स्त्रिया कचरतात. 
 
- रोजचा दिवस ठरलेल्या दिनक्रमापणे घालवणारे पुरुष महिलांना आवडत नाहीत. रोजच्या जगण्यामध्ये एखाद्या दिवशी सरप्राईजची अपेक्षा महिलांना असते. जे पुरुष एखाददिवशी स्त्रियांना डिनर किंवा अन्य सुंदर सरप्राईज देतात ते महिलांना आवडते. 
 

Web Title: Due to these 'bad qualities', women are separated from men due to maladies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.