तांत्रिक बिघाडामुळे हार्बर मार्गावर प्रवाशांचा खोळंबा
By Admin | Updated: January 1, 2017 16:44 IST2017-01-01T09:41:03+5:302017-01-01T16:44:26+5:30
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलची नववर्षाची सुरुवातही खोळंब्याने झाली आहे.

तांत्रिक बिघाडामुळे हार्बर मार्गावर प्रवाशांचा खोळंबा
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलची नववर्षाची सुरुवातही खोळंब्याने झाली आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे लोकल उशिराने धावत असल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. हार्बर मार्गावरील जुईनगर ते वाशीदरम्यान बिघाड झाल्याने लोकल 15 ते 20 मिनिटे धावत आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वर्षाच्या सुरुवातीलाच त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भातील वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.