स्टेअरींग लॉकमुळे बस उतरली खड्ड्यात
By Admin | Updated: October 26, 2016 18:23 IST2016-10-26T18:23:34+5:302016-10-26T18:23:34+5:30
मुक्ताईनगर-मेळसांगवेकडे जाणारी मुक्ताईनगर आगाराची एस.टी.बसचे स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे उचंदे गावाचे पुढे बस खड्ड्यात जावून उतरली या अपघातात चालक व वाहकासह सात प्रवासी किरकोळ जखमी

स्टेअरींग लॉकमुळे बस उतरली खड्ड्यात
ऑनलाइन लोकमत
मुक्ताईनगर, दि. 26 - मुक्ताईनगर-मेळसांगवेकडे जाणारी मुक्ताईनगर आगाराची एस.टी.बसचे स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे उचंदे गावाचे पुढे बस खड्ड्यात जावून उतरली या अपघातात चालक व वाहकासह सात प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास उचंदे-मेळसांगवे रस्त्यादरम्यान घडली.
याबाबत असे की, मुक्ताईनगर आगाराची बस क्र.(एम.एच.२०-डी.८७०६) ही मुक्ताईनगरहून मेळसांगवेकडे जात असताना उचंदे गावानंतर अचानक बसचे स्टेअरींग लॉक झाले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले ती अनियंत्रीत झाली व खड्ड्यात जावून उतरली. या घटनेत सात प्रवासी जखमी झाले. चालक सुरेश जोगी,वाहक लक्ष्मी उत्तम जाधव (वय ३०) (रा.मुक्ताईनगर) हे देखील जखमी झाले आहेत. जखमींवर मुक्ताईनगर उपजिल्हा रुरुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.नंदिणी तनपुरे व कर्मचाऱ्यांनी प्राथमिक उपचार केले. घटनेचे वृत्त समजताच आगारप्रमुख डी.एम.वाणी, वाहतूक निरीक्षक ए.आर.बावस्कर यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमींपैकी भगवान सुतार यांना पुढील उपचारार्थ जळगाव सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पंचायत समितीचे सभापती राजू माळी, भाजप तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, माजी उपसभापती लक्ष्मण भालेराव, अमरदीप पाटील, कल्याण पाटील, माणिक पाटील, पवन पाटील, दिलीप पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयात येवून जखमींची विचारपूस केली.