बंद माळशेज घाटामुळे हॉटेल व्यवसायावर मंदीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2016 01:47 IST2016-07-13T01:47:32+5:302016-07-13T01:47:32+5:30

निसर्गसौंदर्याने नटलेला व पर्यटकांना नेहमीच भुरळ घालणारा घाट म्हणजेच माळशेज घाट. या घाटात पावसाळा सुरू होताच पर्यटकांना मोठी पर्वणीच असते

Due to the slow down of the Malsege loss, hotel business slowdown | बंद माळशेज घाटामुळे हॉटेल व्यवसायावर मंदीचे सावट

बंद माळशेज घाटामुळे हॉटेल व्यवसायावर मंदीचे सावट

धसई : निसर्गसौंदर्याने नटलेला व पर्यटकांना नेहमीच भुरळ घालणारा घाट म्हणजेच माळशेज घाट. या घाटात पावसाळा सुरू होताच पर्यटकांना मोठी पर्वणीच असते. अनेक ठिकाणांहून येथील धबधब्यांमध्ये भिजून चिंब होण्यासाठी तरु णाई मोठ्या प्रमाणात येते. त्यामुळे मुरबाड ते माळशेज घाटाच्या रस्त्यालगत अनेक छोटेमोठे व्यावसायिक हॉटेल, ढाबे, चहाच्या टपऱ्यांवर गर्दी असते. मात्र, गेल्या आठवड्यापासून दोन वेळा घाटात दरड कोसळल्याने येथे येणाऱ्या हौशी पर्यटकांची संख्या कमी झाली.
पावसाळा आला की, शहरांबरोबर ग्रामीण भागातील तरु णाईला वेध लागतात, धबधब्याखाली भिजण्याचे. त्यामुळे अनेक तरु ण मित्र मंडळींसह माळशेज घाटात धाव घेतात. मोटारसायकल, लक्झरी बस यांच्यामधून प्रवास करताना या रस्त्यालगतच्या हॉटेल ढाब्यांवर बसून चहा, जेवण, नाश्ता करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पर्यटकांची रेलचेल दिसते. त्यामुळे हजारो रु पयांचा धंदा आता खूप कमी झाला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून माळशेज घाटात दरडी कोसळत असल्याने अनेक पर्यटकांनी घाटात येण्याऐवजी दुसरीकडील धबधब्यांवर जाणे पसंत केले आहे. त्यामुळे येथील व्यावसायिकांवर मंदीचे सावट आहे.

Web Title: Due to the slow down of the Malsege loss, hotel business slowdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.