सीएसटीजवळ एक्स्प्रेसचे इंजिन घसरल्याने म.रे. विस्कळीत
By Admin | Updated: July 7, 2016 10:03 IST2016-07-07T09:31:05+5:302016-07-07T10:03:35+5:30
सीएसटी स्थानकाजवळ उद्यान एक्स्प्रेसचे इंजिन घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

सीएसटीजवळ एक्स्प्रेसचे इंजिन घसरल्याने म.रे. विस्कळीत
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) स्थानकाजवळ उद्यान एक्स्प्रेसचे इंजिन घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून रेल्वेचे वेळापत्रक बिघडले आहे. गुरूवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास सीएसटी- मस्जिद बंदर दरम्यान उद्यान एक्स्प्रेसचे इंजिन रुळांवरून घसरले आणि मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. यामुळे भायखळा ते सीएसटीदरम्यानची फास्ट अप व डाऊन मार्गावरील वाहतूक स्लो ट्रॅकवर वळवण्यात आली असून फास्ट ट्रॅक पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. मात्र रेल्वेचे वेळापत्रक बिघडल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. ऐन गर्दीच्या वेळेस मध्य रेल्वे कोलमडल्याने अनेक सथानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून कामावर निघालेल्या चाकरमान्यांना माहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.