मिरवणुकीत धक्का लागल्याच्या कारणावरून बेदम मारहाण
By Admin | Updated: July 11, 2017 00:45 IST2017-07-11T00:45:52+5:302017-07-11T00:45:52+5:30
हवेली तालुक्यातील तानाजीनगर (आर्वी) येथे बेंदराच्या मिरवणुकीत नाचत असताना धक्का लागल्याच्या कारणावरून लाथा-बुक्क्या, चाकूने मारहाण केली़

मिरवणुकीत धक्का लागल्याच्या कारणावरून बेदम मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
नसरापूर : हवेली तालुक्यातील तानाजीनगर (आर्वी) येथे बेंदराच्या मिरवणुकीत नाचत असताना धक्का लागल्याच्या कारणावरून लाथा-बुक्क्या, चाकूने मारहाण केली़ या प्रकरणी खेड शिवापूर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बेंदरा (बैल) च्या मिरवणुकीत नाचत असताना गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरासमोर मंगेश गेनबा सणस यास धक्का लागल्याच्या कारणावरून मंगेश गेनबा सणस व सुधीर अशोक पटेकर (दोघे रा. तानाजीनगर, आर्वी, ता. हवेली) यांनी संगनमत करून मंगेश सणस याने त्याच्याजवळील चाकूने अनिल विठ्ठल भोईटे, सुहैल शिवाजी शिंदे, हिरामण दिनकर गायकवाड, राहुल काळुराम कोंडे (सर्व रा. आर्वी) यांना मारहाण करून जखमी केले. तसेच सुधीर याने आम्हा सर्वांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचे अनिल विठ्ठल भोईटे यांनी राजगड पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.