कर्मकांड, अंधश्रद्धा व जातीयतेमुळे अधोगती

By Admin | Updated: June 8, 2014 00:55 IST2014-06-08T00:55:05+5:302014-06-08T00:55:05+5:30

कर्मकांड, अंधश्रद्धा व जातीयतेमुळे देश अधोगतीकडे चालला आहे.

Due to ritualism, superstitions and casteism | कर्मकांड, अंधश्रद्धा व जातीयतेमुळे अधोगती

कर्मकांड, अंधश्रद्धा व जातीयतेमुळे अधोगती

>पिरंगुट : कर्मकांड, अंधश्रद्धा व जातीयतेमुळे देश अधोगतीकडे चालला आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेला धम्माचा मार्ग हा सत्यावर आधारित असल्याने डॉ. बाबासाहेबांनी बुद्धांचा धम्म स्वीकारला. तथागतांच्या तत्त्वज्ञानाला अनुसरून बाबासाहेबांनी या देशाला लोकशाही दिली, असे मत रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी येथे व्यक्त केले.
सम्राट अशोक मंडळ, पिरंगुट येथील ऐतिहासिक बुद्ध विहारात 5 फूट उंच पंचधातूंच्या बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते नुकतीच करण्यात आली.
प्रतिष्ठापना करण्यापूर्वी  ‘बुद्धं सरणं गच्छामि’च्या मंगलमय स्वरांमध्ये बुद्ध मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. पांढरे व परिधान केलेले बौद्ध अनुयायी या मिरवणुकीचे वैशिष्टय़ होते. भदंत सुगतशांतेय, भदंत अश्वजित, भदंत नंदपाल, भदंत महेंद्रबोधी, भदंत चंद्रज्योती यांनी उपस्थित बौद्ध बांधवांना त्रिशरण व पंचशील दिल्यानंतर आंबेडकरांच्या हस्ते बुद्ध मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.(वार्ताहर)

Web Title: Due to ritualism, superstitions and casteism