शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

लाल कांद्यामुळे शेतकरी बनले लखपती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 11:57 IST

आॅगस्टनंतर बाजारात येणाऱ्या लाल कांद्याला यंदा सलग पाच महिने क्विंटलमागे अडीच हजारांपेक्षा अधिक दर मिळाल्याने नाशिक जिल्ह्यातील कोरडवाहू भागातील शेतकरी लखपती होण्याची किमया झाली आहे.

- योगेश बिडवईमुंबई : आॅगस्टनंतर बाजारात येणाऱ्या लाल कांद्याला यंदा सलग पाच महिने क्विंटलमागे अडीच हजारांपेक्षा अधिक दर मिळाल्याने नाशिक जिल्ह्यातील कोरडवाहू भागातील शेतकरी लखपती होण्याची किमया झाली आहे. लासलगाव परिसरात कांद्याच्या पैशांतून किमान ५०० नवे ट्रॅक्टर शेतक-यांच्या दारात उभे राहिले आहेत.१०० वर्षांत पहिल्यांदा दुष्काळी तालुके असलेल्या चांदवड, येवला, नांदगाव व इतर परिसरात कांदा उत्पादकांना घामाचा दाम मिळाला आहे. एकरी ७० हजार खर्च केल्यानंतर दोन एकरातील पिकामुळे शेतक-यांना सुमारे पाच लाख रुपये मिळाले. कोणाकडे ट्रॅक्टर आला, कोणी मालवाहू जीप - मोटारसायकल घेतली, कोणी घराचे काम सुरू केल्याचे चित्र या भागात आहे.प्रल्हाद त्र्यंबक कदम (कातरणी, येवला) यांनी यंदा ९ एकर क्षेत्रात लाल कांद्याची लागवड केली होती. सप्टेंबरच्या जोरदार पावसात पाच एकरातील पीक खराब झाले. मात्र ऐन दिवाळीपूर्वी पुन्हा पाऊस झाल्याने पुढचा कांदा तगला. त्यांना ६०० क्विंटल उत्पादन झाले आणि क्विंटलला सरासरी २,६०० रुपये भाव मिळाल्याने हाती १५ लाख आले. खर्च वगळून त्यांना आठ लाखांचा नफा झाला. गेल्यावर्षी पैसे नसल्याने सव्वा लाखाचा प्लास्टिक कागद शेततळ्यात टाकता आला नव्हता. आता मात्र ही चिंता मिटली आहे.>टेम्पोचालक न्याहारकर झाले लखपतीवाहेगाव साळचे निवृत्त न्याहारकर हे शेतीबरोबरच छोटा टेम्पो चालवितात. कांद्याचे बारदान घेऊन ते मनमाड, सटाणा, देवळा, नामपूर, चाकण, नांदगाव येथे जातात. त्यांनाही यंदा एक एकरमध्ये खर्च वजा जाता १ लाख ६० हजार रुपये झाले. नवरा, बायको, आई आणि त्यांची दोन मुले सगळेच शेतात राबतात. घरची मेहनत असल्याने मजुरांचे पैसे वाचतात. कांद्याच्या चार महिन्यांत सकाळी चहा घेतला की म्हाता-या माणसापासून लहान पोरापर्यंत सारं घर शेतात असतं. माझी आई लंकाबाई, नव्वदाव्या वर्षीही शेतातल्या कामात मदत करते, त्याबिगर तिला चैन पडत नाही.थंडी, गारठा, अंधारात रात्री पाणी भरावंच लागतं. दोन वर्ष चाळीतच कांदा सडला. गेल्या वर्षी कांदाच केला नव्हता.- प्रल्हाद कदम, कातरणी, येवलाकातरणीतील अजित किसन कदम यांनी कांद्याच्या पैशांतून नवा कोरा ट्रॅक्टर घेतला आहे. ५० हजार रुपये अनुदान आणि आणखी पैसे टाकून त्यांनी शेततळे केले. १२ एकरमध्ये ९०० क्विंटल पीक आले. तीन एकरातील कांदा खराब झाला. उतारा नीट मिळाला नाही. मात्र सरासरी अडीच हजार भाव मिळाल्याने तीन पिढ्यांमध्ये झाले नाहीत, असे पैसे कदम कुटुंबीयांना मिळाले.>दूध घालणारे शेतकरी १० लाखांचे धनी!चांदवड तालुक्यातील पाटे येथील सत्तर वर्षीय शेतकरी काशिनाथ राघो ठोके हे लासलगावला दूध घालतात. त्यांना पाच एकरमध्ये कांद्याचे १० लाख रुपये झाले. त्यांनी सहा लाख रुपये खर्च करून शेततळे केले आहे. त्यांच्याकडे तीन म्हशी, एक गाय आहे. माझी आई १०० वर्षांची आहे. तिलाही कांद्याचे एवढे चांगले पैसे झाल्याचे आठवत नाही, असे ठोके यांनी सांगितले.>केंद्र सरकारचा हस्तक्षेपच नडतोसरकारने यंदा कांद्याच्या बाजारपेठेत हस्तक्षेप न केल्याने व निर्यातीवर बंधने न आणल्याने चांगला भाव मिळाला, असे नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी सांगितले.>शेतकरी बँकेतील ठेवी २०० कोटींवरलोकनेते दत्ताजी पाटील बँकेच्या लासलगाव शाखेत १३६ कोटींवर असलेल्या ठेवी जानेवारी अखेर १९६ कोटींवर गेल्या. शेतकºयांनी गहाण ठेवलेले ५ कोटींचे सोने सोडविले आहे.>२७०० कोटींची उलाढालनाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव, उमराणे व सोलापूर या चार बाजार समित्यांची एप्रिल १७ ते जानेवारी १८ या कालावधीत २,७५७ कोटी ९१ लाख ८८ हजार १२० रुपये उलाढाल झाली.>एक कोटींचे उत्पन्नयेवला तालुक्यातील धामणगाव येथील महेश जेजुरकर यांचे मोठे कुटुंब आहे. त्यांचे दोन काका निवृत्त अधिकारी आहेत. घरात शेतकरी संघटनेचा वारसा आहे. जेजुरकर कुटुंबाने १०० एकर कांदा केला. त्याचे त्यांना एक कोटी रुपये उत्पन्न मिळाले.>दुष्काळी चांदवड तालुकाही सुखावलासतत दुष्काळ असणा-या चांदवड तालुक्यात कोणाला लाल कांद्याचे १० लाख, कोणाला २० लाख रुपये झाले आहेत. सोनीसांगवी, दहिवद, दिघवद, जोपूळ, भोयेगाव, हिवरखेडे, तळेगाव येथे कांद्याला भाव मिळाल्याने शेतकरी समाधानी आहेत. साडेपाच हजार लोकसंख्येच्या तळेगावात दिवसाला चार-पाच नवे ट्रॅक्टर येतात. गावात ५० ट्रॅक्टर आले आहेत. काहींनी पीक-अप वाहने घेतली.

टॅग्स :onionकांदाNashikनाशिक