कांबळे यांच्या बंडखोरीमुळे मोडंिनंब गटात चुरस
By Admin | Updated: February 16, 2017 19:11 IST2017-02-16T19:11:22+5:302017-02-16T19:11:22+5:30
कांबळे यांच्या बंडखोरीमुळे मोडंिनंब गटात चुरस

कांबळे यांच्या बंडखोरीमुळे मोडंिनंब गटात चुरस
कांबळे यांच्या बंडखोरीमुळे मोडंिनंब गटात चुरस
मोडनिंब : आॅनलाईन लोकमत सोलापूर
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या मोडनिंब गटात सलग चार वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिलेले शिवाजी कांबळे यांनी बंडखोरी केल्याने जोरदार चुरस निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि कांबळे यांच्यातील ही तिरंगी लढत सर्वांच्या उत्सुकतेचा विषय बनली आहे.
मोडनिंब जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण पुरुषांसाठी खुला असल्याने आरक्षण पडल्यापासून हा मतदारसंघ चर्चेत होता. या मतदारसंघात राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या असून जिल्हा परिषदेच्या एका जागेसाठी सहा जण तर मोडनिंब पंचायत समिती गणात तीन तर लऊळ गणात चार जण आपले नशीब अजमावत आहेत.
मोडनिंब जिल्हा परिषद गट हा जरी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी या गटातील मोडनिंब गणातून मात्र अपक्ष उमेदवार विजयी झाला तर लऊळ गणातून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला होता. या निवडणुकीत आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यापासून मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने पंचायत समितीचा उमेदवार न दिल्याने ऐनवेळी अर्थ व बांधकाम खात्याचे माजी सभापती भारत शिंदे निवडणूक रिंगणात उतरून त्यांनी विजय मिळविला व त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र माढा विधानसभा मतदारसंघातील भविष्यात होणारा विरोध दूर करण्यासाठी शिंदे यांनी भारत शिंदे यांना आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू केले होते. सुरुवातीला त्यांना त्यामध्ये यश न आल्याने या गटातील उमेदवारी कोणाला द्यायची, हा प्रश्न आ. शिंदे यांच्यापुढे पडला असताना अनेकांनी त्यांचे पुत्र रणजित शिंदे यांनाच रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेऊन उमेदवारी जाहीर केली. त्याप्रमाणे रणजित शिंदे यांनी या गटातील मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली.
आमदार शिंदे यांचे बंधू रमेश शिंदे यांचे चिरंजीव धनराज शिंदे हे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणात आले व त्यांनी पुणे, माढा विधानसभा मतदारसंघात सभा घेऊन आ. शिंदे यांचा प्रचार केला. मात्र यावेळी त्यांनी युवकांची मोठी फौज तयार केली. सभापतीपद सर्वसाधारण असल्याने धनराज शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी आपण पंचायत समितीची निवडणूक लढवावी, असा आग्रह धरल्यामुळे व धनराज शिंदे यांनीही आपल्या हजारो कार्यकर्त्यांसमवेत आ. शिंदे यांच्यासमोर उमेदवारीची मागणी केली.
पुतण्याने काकासमोर केलेल्या शक्तिप्रदर्शनाची दखल काकांना घ्यावी लागली. त्यांना लऊळ पंचायत समिती गणातून उमेदवार देण्यात आली. दुसरीकडे भारत शिंदेंना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर रणजित शिंदे यांना माघार घ्यावी लागली. मोडनिंब जि.प. गटात आता तिरंगी लढत होणार असून यामध्ये कोण बाजी मारणार हे निकाला दिवशीच स्पष्ट होणार आहे.
४या सर्व घडामोडी सुरू असताना समाजकल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे हे आपल्या कार्यकर्त्यांसह रणजित शिंदे यांच्या उमेदवारीमुळे शांत होते. मात्र अचानक भारत शिंदे यांना उमेदवारी दिल्याने शिवाजी कांबळे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे शिंदे बंधूंच्या या कट्टर समर्थकाने राष्ट्रवादीतून बंडखोरी करून ‘हम भी किसीसे कम नही’ म्हणत निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे या गटातील निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे तर भारत शिंदे हे स्वगृही परतल्याने शिवसेनेला कोणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न निर्माण झाला होता. मोडनिंब ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवाजी सुर्वे हे अपक्ष उमेदवारी दाखल करण्यासाठी चालले असता शिवसेनेने त्यांना उमेदवारी बहाल केली.
४मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत दिनेश गिड्डे यांच्यासह काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले बालाजी शिंदे यांनी बंडखोरी केली तर राष्ट्रवादीचे वसंत नलवडे यांनीही बंडखोरी केली असल्याने या जिल्हा परिषद गटाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.