पावसामुळे तिनही मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत

By Admin | Updated: June 25, 2016 09:08 IST2016-06-25T09:07:55+5:302016-06-25T09:08:34+5:30

शनिवारीही पावसाचा तडाखा कायम असून पावसामुळे मुंबईतील मध्य, हार्बर व पश्चिम या तिनही मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे.

Due to the rains, the railway services on three roads were disrupted | पावसामुळे तिनही मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत

पावसामुळे तिनही मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - मुंबईत अखेर मान्सूनचे आगमन झाले असून शुक्रवारी दिवसभराच्या पावसानंतर शनिवारीही पावसाचा तडाखा कायम असून पावसामुळे मुंबईतील तिनही मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल उशीराने धावत असून कामावर निघालेल्या चाकरमान्यांना मोठ मनस्ताप सहन करावा लागत आहे. 
मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू असून हार्बर लोकलही १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वेवरही तीच परिस्थिती असून लोकलना २० मिनिटे उशीर होत असल्याने सर्व स्थानकांवर मोठी गर्दी पहायला मिळत आहे

Web Title: Due to the rains, the railway services on three roads were disrupted