नाशिकमध्ये पावसामुळे पुरातन राम लक्ष्मण मंदिराचा भाग कोसळला
By Admin | Updated: July 11, 2016 08:53 IST2016-07-11T08:52:35+5:302016-07-11T08:53:16+5:30
पंचवटी श्री काळाराम मंदिर परिसरातील पुरातन राम लक्ष्मण मंदिराचा (भोलादासजी का मंदिराचा) काही भाग पावसामुळे रविवारी रात्री कोसळला

नाशिकमध्ये पावसामुळे पुरातन राम लक्ष्मण मंदिराचा भाग कोसळला
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ११ - पंचवटी श्री काळाराम मंदिर परिसरातील पुरातन राम लक्ष्मण मंदिराचा (भोलादासजी का मंदिराचा) काही भाग पावसामुळे रविवारी कोसळला. रात्री पावणेबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झालेली नाही.