शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वीज बील थकविल्यामुळे ठाणे जि.प.च्या शिक्षण विभागांचा दिवसभर  वीज पुरवठा खंडीत

By सुरेश लोखंडे | Updated: December 22, 2017 17:36 IST

सुमारे ५२ हजार रूपयांचे वीज बील थकविल्यामुळे महावितरण विभागाने माध्यमिक व प्राथमिक दोन्ही विभागांच्या इमारतीसह समाजकल्याण विभागाचा वीज पुरवठा शुक्रवारी खंडीत करण्यात आला

ठळक मुद्देमाध्यमिक व प्राथमिक दोन्ही विभागांच्या इमारतीसह समाजकल्याण विभागाचा वीज पुरवठा शुक्रवारी खंडीतशिक्षण विभगात कामसाठी आलेल्या नागरीकांची कामे न झाल्यामुळे त्यांना निराश होऊन घरी जावे लागाले.

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सुमारे ५२ हजार रूपयांचे वीज बील थकविल्यामुळे महावितरण विभागाने माध्यमिक व प्राथमिक दोन्ही विभागांच्या इमारतीसह समाजकल्याण विभागाचा वीज पुरवठा शुक्रवारी खंडीत करण्यात आला. यामुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना दिवसभर अंधारात कामकाज करावे लागले.जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीला लागून प्रशासकीय इमारतीमधील प्राथमिक शिक्षण विभाग व मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी सुमारे १९५४ मध्ये उद्घाटन केलेल्या अण्णासाहेब वर्तक सभागृहाच्या या जुन्या इमारतीतील माध्यमिक शिक्षण विभाग व तळमजल्यावरील समाजकल्याण विभाग आज दिवसभर अंधारात चाचपडत होता. सुमारे आॅगस्टपासून ५२ हजार रूपयांचे वीज बील न भरल्यामुळे महावितरण विभागाने ही कारवाई केली . इतर खर्चासाठी मिळणारा निधी नूतन वर्षात मिळणार असल्यामुळे वीज बीलाची रक्कम भरणे शक्य झाले नाही. परंतु बांधकाम विभागाने बील भरण्याचा हवाला दिल्यामुळे शिक्षणाधिकारी मीना यादव यांनीही याकडे लक्ष दिले नसल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय महावितरण विभागाने देखील कोणतीही पूर्व सूचना न देता वीज पुरवठा खंडीतकरण्याची कारवाई केली आहे.या दोन्ही इमारतींचा विज पुरवठा अचानकपणे खंडीत झाल्यामुळे नेहमीप्रमाणे लोड शेडींग झाल्याचा आंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु दीर्घकाळानंतरही वीज न आल्यामुळे चौकशी केली असता बील थकविल्यामुळे कारवाई झाल्याचे लक्षात आले. महावितरण विभागाकडून कोणतीही अगाऊ सुचना न देता विजपुरवठा खंडीत केल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत होती. यामुळे शिक्षण विभगाच्या दोन्ही इमारतींचे कामकाज ठप्प झाले होते. तर, शिक्षण विभगात कामसाठी आलेल्या नागरीकांची कामे न झाल्यामुळे त्यांना निराश होऊन घरी जावे लागाले.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषदcollectorतहसीलदार