व्यक्तीगत आरोपामुळे मुलीला घटस्फोट घ्यायला लागला - एकनाथ खडसे
By Admin | Updated: September 26, 2014 17:17 IST2014-09-26T17:17:47+5:302014-09-26T17:17:47+5:30
राजकीय जीवनामध्ये व्यक्तीगत आरोप करणे चुकीचे असून अशा या आरोपामुळे मला माझ्या मुलीला घटस्फोट घ्यायला लागल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले.

व्यक्तीगत आरोपामुळे मुलीला घटस्फोट घ्यायला लागला - एकनाथ खडसे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - राजकीय जीवनामध्ये व्यक्तीगत आरोप करणे चुकीचे असून अशा या आरोपामुळे मला माझ्या मुलीला घटस्फोट घ्यायला लागल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले. एका खासगी वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात खडसे बोलत होते यावेळी खडसे यांनी आपल्या राजकारणातील अनेक गोष्टी मनमोळेपणाने मांडल्या.
जळगावमधील तापी भ्रष्टाचार प्रकरणी आपल्या जावई आणि व्याही यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांना तुरूंगात टाका या मताचा मी असतानाही अनेकांनी त्याचा संबंध माझ्याशी जोडून विनाकारण त्याचे राजकारण केले. राजकीय जीवनात व्यक्तीगत आरोप झाल्याने आपण व्यथीत होवून अखेर मुलीला घटस्फोट घ्यायला लावला. ही हिंमत केवळ एकनाथ खडसे यांच्यातच आहे म्हणूनच हा निर्णय घेतला असल्याचे खडसे म्हणाले. राजकारणात कोणीही आपल्यावर भ्रष्टाचाराचा आरोप सिध्द केल्यास तात्काळ राजकारणातून निवृत्त होईल. विरोधीपक्ष नेते म्हणून आपण आजपर्यंत सरकारचे ११६ भ्रष्टाचार बाहेर काढले असून आपण तीन वर्ष केलेल्या प्रयत्नामुळेच सुप्रिया सुळे, सदानंद सुळे आणि शाहिद बलवा यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती खडसे यांनी दिली. शरद पवार यांनी आपल्यावर तोडपाणी करण्याचा आरोप केला होता. त्याला सडेतोड उत्तर देवून आपण ते सिध्द करण्याचे पवार यांना आव्हान दिले होते परंतू पवारांनी अद्याप ते आव्हान स्विकारले नसल्याची माहिती खडसे यांनी यावेळी दिली. महाराष्ट्रात दलित समाजावर रोज अत्याचार होतात. खैरलांजी गावात माणसे कोळशासारखी जाळून मारली जातात, नगर जिल्हयात बाईला नागडे करून फिरवले जातात तरिही काँग्रेस - राष्ट्रवादी यांचे आघाडी सरकार पुरोगामी महाराष्ट्र असल्याचा टेंभा मिरवतात. गावित आणि बबनराव पाचपुते यांच्या भाजप प्रवेशावर बोलताना बोलताना खडसे म्हणाले की, जर त्यांच्यावरील भ्रष्टाचार सिध्द झाल्यास त्यांना पक्षातून हाकलण्यास भाजप मागेपुढे पाहणार नसल्याचे स्पष्टीकरण खडसे यांनी दिले.