भांडुपमधील पालिकेच्या उद्यानाची दुरवस्था

By Admin | Updated: August 22, 2016 02:15 IST2016-08-22T02:15:35+5:302016-08-22T02:15:35+5:30

मुलांसाठी उभारलेल्या भांडुप येथील महापालिका उद्यानाची दुरवस्था झाली आहे.

Due to the park's garden deterioration | भांडुपमधील पालिकेच्या उद्यानाची दुरवस्था

भांडुपमधील पालिकेच्या उद्यानाची दुरवस्था


मुंबई : मुलांसाठी उभारलेल्या भांडुप येथील महापालिका उद्यानाची दुरवस्था झाली आहे. येथील झोपाळे, घसरगुंडी व अन्य मनोरंजनाचे साहित्य तुटले आहे. महापालिकेकडे याबाबत तक्रार करूनही प्रशासनाने काहीच कार्यवाही केलेली नाही. शिवाय स्थानिक लोकप्रतिनिधींनीही याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी, नागरिक संताप व्यक्त करीत असून, उद्यानाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करीत आहेत.
भांडुप पश्चिम येथील सरदार प्रतापसिंह संकुलाजवळ महापालिकेचे उद्यान आहे. या उद्यानात लहान मुलांसाठी मनोरंजनाचे साहित्य बसविण्यात आले आहे. मात्र या उद्यानातील घसरगुंडी, झोपाळे यांची दुरवस्था झाली होती. स्थानिकांनी उद्यानाच्या दुरुस्तीसाठी तगादा लावल्यानंतर येथील उद्यानाची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, या उद्यानाची देखभाल होत नसल्यामुळे मनोरंजनाच्या साहित्याचे पुन्हा नुकसान होत आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. ठिकठिकाणी साहित्य तुटल्यामुळे लहान मुलांना उद्यानात खेळता येत नाही. येथे सुरक्षारक्षक नसल्याने साहित्याचा गैरवापर होतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी रिकाम्या जागेचा गैरफायदा घेत, गर्दुल्ले मैदानात वावरत असतात. स्थानिकांच्या तक्रारीनंतर गर्दुल्ल्यांवर कारवाई करण्यात येते. मात्र, काही दिवसांनी परिस्थिती पूर्वीसारखीच होते. यावर स्थानिकांनी संताप व्यक्त करत, खेळासाठी मुलांना जागा उपलब्ध करून देण्यासोबतच महापालिकेने उद्यानांची काळजी घ्यावी, शिवाय लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे लक्ष द्यायला हवे, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
>महापालिका उद्यानासाठी सुरक्षारक्षक नसल्यामुळे या ठिकाणी रात्री गर्दुल्ल्यांचा सुळसुळाट असतो. येथील लहान मुलांच्या खेळण्यांची गेल्या काही दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. अनेकदा तक्रारी करूनही पालिकेचा एकही माणूस येथे फिरकत नाही.
- मनोहर शिंदे, रहिवासी

Web Title: Due to the park's garden deterioration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.