महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू

By Admin | Updated: February 7, 2016 17:03 IST2016-02-07T17:03:32+5:302016-02-07T17:03:32+5:30

औरंगाबाद महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे आठवर्षाच्या मुलाचा खड्डयात पडून दुर्देवी मृत्यू झाला.

Due to negligence of the corporation, the child dies due to negligence | महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू

महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत 

काजीवाडा, दि. ७ - औरंगाबाद महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे आठवर्षाच्या मुलाचा खड्डयात पडून दुर्देवी मृत्यू झाला. आकाश बंडू जाधव असे मृत मुलाचे नाव आहे. काचीवाडयाच्या धोबीघाट परिसरात ही घटना घडली. 
भूमिगत गटार बांधण्यासाठी हा खड्डा खोदला होता. दोन दिवसांपासून पालिकेचे काम बंद होते. मात्र खोदलेल्या खड्ड्याच्या ठिकाणी पालिकेने सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपायोजना केली नव्हती. शनिवारपासून आकाश बेपत्ता होता. आज सकाळी नाल्यात तो मृतावस्थेत आढळला. 

Web Title: Due to negligence of the corporation, the child dies due to negligence