शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत पुरस्कारामुळे आरोग्य खात्याची धुरा खांद्यावर - डॉ. भारती पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 11:43 IST

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या आदिवासी राखीव असलेल्या लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच महिला खासदार म्हणून निवडून आलेल्या डॉ. भारती पवार यांचा नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा झाला.

नाशिक : महाराष्ट्राचा  मानबिंदू असलेल्या ‘लोकमत’ने माझ्या अवघ्या सहा महिन्यांच्या खासदारकीच्या कारकिर्दीचे अवलोकन करून उत्कृष्ट संसद पुरस्कारासाठी देशपातळीवर माझी निवड केली. दिल्लीत झालेल्या या सोहळ्यामुळे आपली देशात ओळख तर झालीच, शिवाय भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांनीही या निमित्ताने माझे गुण हेरले. त्यामुळेच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात आपली सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली, अशा शब्दांत डॉ. भारती पवार यांनी कृतज्ञतेची भावना ‘लोकमत’ समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांच्याशी बोलताना  व्यक्त केली.नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या आदिवासी राखीव असलेल्या लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच महिला खासदार म्हणून निवडून आलेल्या डॉ. भारती पवार यांचा नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा झाला. डॉ. भारती पवार यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्यापूर्वी ‘लोकमत’ समूहाच्या वतीने सन २०१९ मध्ये लोकसभेत मतदारसंघाचे प्रश्न मांडून, त्याचा हिरिरीने पाठपुरावा करणाऱ्या देशपातळीवरील उत्कृष्ट खासदारांचा शोध घेतला असता, त्यात डॉ. भारती पवार यांची निवड करण्यात आली. दिल्लीत झालेल्या या सोहळ्यात त्यांना ‘उत्कृष्ट संसद सदस्य’ म्हणून गौरविण्यात आले होते. त्याची आठवण ठेवून विजय दर्डा यांनी आवर्जून डॉ. भारती पवार यांच्याशी संपर्क साधून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री पवार यांनीही ‘लोकमत’कडून मिळालेल्या पुरस्काराची आवर्जून आठवण करून देत हा पुरस्कारच खऱ्या अर्थाने मला अधिक काम करण्याची प्रेरणा व आशीर्वाद देऊन गेल्याचे सांगितले. केंद्रीय पदी विराजमान होऊनही डॉ. भारती पवार यांनी ‘लोकमत’च्या पुरस्काराची आठवण  ठेवल्याबद्दल विजय दर्डा यांनाही काहीसे आश्चर्य वाटले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन ‘लोकमत’ नेहमीच आपल्या पाठीशी राहील, अशी ग्वाहीही विजय दर्डा यांनी दिली. 

‘लोकमत’च्या पुरस्काराची दखल आपल्या केंद्रीय मंत्रिपदासाठी अधिक फायदेशीर ठरली असून, लोकमतचे ऋण आपण कधीही विसरू शकणार नाही, असे डॉ. पवार यांनी सांगितले. लोकमतच्या ‘रक्ताचे नाते’ या रक्तदान अभियानाला शुभेच्छा देत नागरिकांनी त्यात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.      - डॉ. भारती पवार  

टॅग्स :Dr Bharti Pawarडॉ. भारती पवारBJPभाजपाLokmatलोकमत