निधीअभावी रखडली ‘जलयुक्त’ची कामे

By Admin | Updated: April 30, 2016 00:52 IST2016-04-30T00:52:04+5:302016-04-30T00:52:04+5:30

पुरंदर तालुक्यातील २४ गावांतून सुमारे २ हजार २२७ कामांचे प्रस्ताव शासनदरबारी निधीअभावी रखडलेले आहेत.

Due to lack of funds, works of 'Jalakshi' | निधीअभावी रखडली ‘जलयुक्त’ची कामे

निधीअभावी रखडली ‘जलयुक्त’ची कामे

जेजुरी : पुरंदर तालुक्यातील २४ गावांतून सुमारे २ हजार २२७ कामांचे प्रस्ताव शासनदरबारी निधीअभावी रखडलेले आहेत. यामुळे यावर्षी जलयुक्त शिवारचे एकही काम सुरू होऊ शकलेले नाही.
पुरंदर तालुक्यातील पांगारे, शिंदेवाडी-खेंगरेवाडी, घेरापुरंदर, हरणी, पिसुर्टी, आस्करवाडी, भिवरी, वनपुरी, कोडीत बुद्रुक, गराडे, पिंपरी, खानवडी, बेलसर, माळशिरस, नायगाव, कर्नलवाडी, कोळ विहीरे, राख, दौडज, खळद, कोथळे, पिसर्वे, पोंढे, बोऱ्हाळवाडी या २४ गावांतील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुमारे २ हजार २२७ कामे प्रस्तावित आहेत.
या कामासाठीचा शासनाच्या लघुपाटबंधारे विभाग वगळता कृषी विभाग ३८ कोटी १५ लाख ५३ हजार रुपये खर्चाची १८५५ कामे, छोटे पाटबंधारे विभागाची ३ कोटी १ लाख ६४ हजार रुपयांची २१ कामे, प्राथमिक पाणीपुरवठा विभाग ३९ लाख ५० हजार रुपयांची १२ कामे, वनविभागाची ५३ लाख १३ हजार रुपयांची २०८ कामे, सामाजिक वनीकरण विभागाची ४४ लाख ५१ हजार रुपये खर्चाची ५३ कामे, जलसंधारण विभागाची २ कोटी २२ लाख ४० हजार रुपयांची १८ कामे आणि भूजल सर्वेक्षणकडून १५ लाख ७२ हजार रुपयांची ६० कामे गृहीत धरून सुमारे ४४ कोटी ९२ लाख ४३ हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे.
या विभागांच्या तालुका प्रशासनाकडून गेल्या डिसेंबर
व जानेवारी महिन्यातच या
कामांचे प्रस्ताव त्या त्या विभागाच्या जिल्हा प्रशासनाकडे पाठवलेले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून
या प्रस्तावित कामांना मंजुरी
व निधी उपलब्ध करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केला जातो. मात्र या आराखड्यासाठी अजूनही निधी उपलब्ध झालेला नाही.
६७० कामे ठप्प : ११ कोटी २३ लाख रुपयांची प्रतीक्षा
>गेल्यावर्षीच्याच विकास आराखड्यातील सुमारे १ हजार ५९० कामांपैकी ६७० कामे अजूनही निधीअभावी रखडलेली आहेत. गेल्यावर्षीच्या ४७ कोटी ५२ लाख ७९ हजार रुपयांच्या आराखड्यातील आतापर्यंत ३२ कोटी १८ लाख ५३ हजार रुपयांचाच निधी मिळू शकला आहे. उर्वरित सुमारे ११ कोटी २३ लाख रुपये निधीची प्रतीक्षा आहे.
गेल्यावर्षीचाच निधी उपलब्ध झाला नसतानाही या वर्षीच्या आराखड्यातील कामांची भूमिपूजने घेण्यात आलेली आहेत. भूमिपूजनाचे कार्यक्रम होऊन दोन महिने उलटले तरीही ती कामे अजूनही सुरूच होऊ शकलेली नाहीत. यामुळे जळयुक्त शिवार अभियानांतर्गत कामाबाबत गावागावातून मोठी चर्चा आहे. या वर्षीच्या आराखड्याचा निधी कधी मिळणार व आराखड्यातील किमान भूमिपूजने झालेली कामे तरी पूर्ण होतील का? या संभ्रमात लाभार्थी गावातील गावपुढारी तसेच पदाधिकारी आहेत.

Web Title: Due to lack of funds, works of 'Jalakshi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.