शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आजारपणामुळे विष्णू सवरा यांना मंत्रीमंडळातून वगळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 05:09 IST

विष्णू सवरा हे आजारपणामुळे गेले ४ महिने ते कोणत्याही जाहीर कार्यक्रमात तसेच मंत्रीमंडळांच्या बैठकीतही ते उपस्थित राहत नव्हते

- वसंत भोईर वाडा (पालघर) : महाराष्ट्रचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांना रविवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या वेळी मंत्रीमंडळातून वगळण्यात आले आहे. ते पित्ताशयाच्या विकाराने आजारी आहेत. त्यांच्यावर पुढील महिन्यात मोठी शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे त्यांनीच आपणाला मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.विष्णू सवरा हे आजारपणामुळे गेले ४ महिने ते कोणत्याही जाहीर कार्यक्रमात तसेच मंत्रीमंडळांच्या बैठकीतही ते उपस्थित राहत नव्हते, असे त्यांचे चिरंजीव आणि सर्जन डॉ. हेमंत सवरा यांनी सांगितले. यामुळे पालघर जिल्ह्याला मिळालेले एकमेव मंत्रीपद आता हरपले आहे. आदिवासी योजना आढावा समितीच्या राज्यमंत्री दर्जाच्या अध्यक्षपदाच्या रुपाने वसईच्या विवेक पंडीत यांच्या स्वरुपात राज्यमंत्री दर्जाचे पद पालघर जिल्ह्याला अलीकडेच मिळाले आहेत.सवरा यांच्या रुपाने राज्याचे आदिवासी विकासमंत्रीपद पालघर जिल्ह्याला लाभले होते. ते आता हरपले आहे. ते पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. परंतु प्रकृती अस्वास्थामुळे गेले काही महिने ते खूपच अशक्त झाले होते. त्याचप्रमाणे पक्षकार्य, खात्याच्या बैठका, सार्वजनिक कार्यक्रम यापासून ते अलिप्त राहत होते.सवरा यांच्याबद्दल तसेच त्यांच्या खात्याच्या कारभाराबद्दल पक्षात आणि एकूणच प्रचंड नाराजी होती. त्यामुळे ते राहत असलेल्या वाडा या शहराच्या नगर पंचायतीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी कन्या निशा पराभूत झाली होती. तर ही नगरपंचायत शिवसेनेने जिंकली होती. ते पालकमंत्री असलेल्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, पालघर, या दोन नगरपंचायती व जव्हार पालिका यात सेनेचा झेंडा फडकला होता. २०१८ मध्ये झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आपला पुत्र हेमंत याला भाजपने उमेदवारी द्यावी हा त्यांचा हट्ट पक्षाने धुडकावला होता. ही पोटनिवडणूक आणि नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणुक यातही त्यांना फारसेस्थान पक्षाने दिले नव्हते. त्यामुळे आता त्यांच्या पुत्राला त्यांचा उत्तराधिकारी म्हणून भाजपा पुढे करतो की काय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.जिल्ह्यातून भाजप कुणाला मंत्रिपद देते याकडे लक्षपालघर जिल्ह्यातील विक्रमगड आणि डहाणू या दोनच मतदारसंघात भाजपाचे आमदार होते. यापैकी विक्रमगड मधून सवरा निवडून आले होते तर डहाणूचे आमदार पास्कल धनारे हे पालघर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष असले तरी त्यांच्या विरोधात प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे आता भाजप या जिल्ह्यातून कुणाला मंत्रीपद देते याकडे सगळ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :vishnu savaraविष्णू सावराBJPभाजपा