शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

अवैध वाळूउपशामुळे वैतरणा नदीवरील पूल धोकादायक

By admin | Updated: August 8, 2016 05:27 IST

महाड येथील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेत पूल कोसळल्यामुळे अनेक वाहने वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच सरकार अनेक धोकादायक पुलांचा आढावा घेत आहे

मुंबई : महाड येथील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेत पूल कोसळल्यामुळे अनेक वाहने वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच सरकार अनेक धोकादायक पुलांचा आढावा घेत आहे. मात्र या आढाव्यात रेल्वेच्या हद्दीतून जाणाऱ्या पुलांकडे दुर्लक्षच होत असल्याची बाब समोर आली. पश्चिम रेल्वेचा वैतरणा नदीवरील पूल वाळूउपशामुळे धोकादायक बनला आहे. वाळूउपशावर बंदी आणावी, अशी मागणी रेल्वेने सरकारकडे केली आहे. सरकारकडून ठोस कारवाई होत नसल्याने दुर्घटना घडल्यास सरकारच जबाबदार राहील, असे नमूद करणारी नोटीसच पश्चिम रेल्वेकडून पाठविण्यात आली आहे. त्यामुळे खडबडून जाग्या झालेल्या सरकारकडून कारवाई करण्यात येत आहे.

वैतरणा नदीवरील पुलाजवळ वाळूउपसा केला जातो. त्याकडे लक्ष वेधत पश्चिम रेल्वेने जून २0१२मध्ये सरकारकडे पत्रव्यवहार करून वाळूउपशावर बंदी आणण्याची मागणी केली. पण गेली चार वर्षे त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अखेर २0१६मध्ये पुन्हा एकदा सरकारकडे त्यासंबंधी पत्रव्यवहार केला आहे. हे पत्र महसूल विभागाच्या प्रमुख सचिवास पाठविण्यात आल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांकडून देण्यात आली.

या पत्रात वाळूउपशामुळे पूल धोकादायक बनल्याचे नमूद केले आहे. हे पत्र पश्चिम रेल्वेचे इंजिनीअर के. स्वामी यांनी पाठविले आहे. आॅक्टोबर २0११मध्ये या भागातच २४ तास टेहळणी आणि वाळूउपशावरील निर्बधांचे आदेश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले होते. या आदेशानंतरही बिनदिक्कत वाळूउपसा सुरूच आहे. वैतरणा स्टेशनजवळील रेल्वे पुलाकडील काही भाग आॅगस्ट २0१२मध्ये कोसळला होता. त्यामुळे दोन दिवस रेल्वे सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर पश्चिम रेल्वेकडून त्या पुलाची पाहणी करण्यासाठी सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पॉवर रिसर्च स्टेशनची नियुक्ती केली आणि २0१२मध्येच दिलेल्या अहवालातही वाळूउपशाचा मुद्दा यातून मांडण्यात आला होता.

वैतरणा पुलाजवळ होत असलेल्या वाळूउपशामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. गेली चार वर्षे आम्ही सरकारकडे पत्रव्यवहार करीत आहोत. मात्र दुर्लक्षच केले जात असल्याने अखेर सेक्शन २0 अंतर्गत १९८९नुसार आम्ही महसूल प्रधान सचिव, जिल्हा प्रशासनाला ४ जून २0१६ रोजी नोटीसही पाठविली आहे. या नोटीसमध्ये पुलाला धोका निर्माण होऊन एखादी घटना घडल्यास त्याला सरकारच जबाबदार राहील, असे नमूद केले आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले. रविवारी वैतरणा नदीजवळ वाळूउपसा करणाऱ्या २२ बोटी, तीन डिझेल इंजिन, सक्शन पंप हे जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले. तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई जरी करण्यात आली असली तरी वैतरणा नदीवरील पूल हा धोकादायक अवस्थेतच पोहोचला आहे. त्यामुळे करण्यात आलेल्या कारवाईनंतर वाळूउपसा कायमस्वरूपी बंद होईल का यावर मात्र प्रश्नच आहे.