शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
2
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
3
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
4
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
5
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
6
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
7
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
8
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
9
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
10
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
11
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
12
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
13
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
14
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
15
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
16
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
17
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
18
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
19
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
20
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती, वाहून गेलेल्या 5 जणांपैकी तिघांचे सापडले मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 14:26 IST

पालघर जिल्ह्यात मंगळवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान पुरामध्ये वाहून गेलेल्या 5 जणांपैकी 3 जणांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. तर दोन जण अजूनही बेपत्ता आहेत.  

पालघर, दि. 30 - पालघर जिल्ह्यात मंगळवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान पुरामध्ये वाहून गेलेल्या 5 जणांपैकी 3 जणांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. तर दोन जण अजूनही बेपत्ता आहेत.  मृत व्यक्तींचं नावं 1. तनिष्का राम बालशी (वय 5 वर्ष), पालघर2. नैना  गहला (वय 50 वर्ष)  3. राजेश नायर, बोईसरतनिष्का राम बालशी ही पाच वर्षांची मुलगी पालघरमीधल वेवूर येथील रहिवासी होती. नैना गहला (50 वर्ष) या डहाणूतील आंबेसरी येथील रहिवासी होत्या. तर राजेश नायर हे बोईसर येथील राहणारे होते. 

बेपत्ता व्यक्तींची नावं1. सुरोत्तम झा ( वय 25 वर्ष, नवली पालघर)2. नरु वळवी ( वय 45 वर्ष,  डहाणू) 

विक्रोळीत इमारत कोसळून एकाचा तर दरड कोसळल्याने दोघांचा मृत्यूदरम्यान, मंगळवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका अनेकांना बसला असून विक्रोळीत इमारत कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. विक्रोळीच्या वर्षानगर भागातील ही इमारत आहे. दोन मजली इमारत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे विक्रोळीत दरडही कोसळली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. विक्रोळीमधील सूर्यानगर येथे ही दरड कोसळली आहे .  दरम्यान, आज बुधवारीही (30 ऑगस्ट) पावसाचा जोर कायम राहील, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. अनेक सखल भागात अद्यापही पाणी तुंबलेले आहे. जेथे अशी धोकादायक ठिकाणे आहेत, तेथे एनडीआरएफचे जवान लोकांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

घराबाहेर न पडण्याचं आवाहन

येत्या २४ तासांत मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्हा येथे मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नागरिकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच मच्छीमार बांधवांनीही समुद्रात जाऊ नये, असे आवाहन मंत्रालय, नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे. एकंदरीतच मंगळवारी मुंबईकरांना झोडपून काढलेला पाऊस बुधवारीही मुंबईकरांना धडकीच भरविणार असल्याचे चित्र असून नेहमी धावणारी मुंबई संथगतीने सुरु आहे.

मुसळधार पावसामुळे कोलमडलेली मुंबई आता हळूहळू पुर्वपदावर येऊ लागली आहे. मात्र मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांना घरी पोहोचताच आलं नाही. पाऊस रौद्र रुप धारण करत असल्याचं लक्षात येताच अनेकांनी ऑफिसमधून लवकर घरी जाणं पसंद केलं. मात्र पाऊस इतका मुसळधार सुरु होता की, स्टेशनला पोहोचल्यानंतर रेल्वे ठप्प असल्याने तिथेच रात्र घालवावी लागली. या पावसामध्ये मुंबईकरांचं पोट भरणारे डबेवालेही अडकून पडले होते. दोन वेळचं जेवण मिळावं म्हणून धावणा-या मुंबईकराचं पोट भरण्याचं काम करणा-या डबेवाल्यांना संपुर्ण रात्र लोकल ट्रेनमध्येच घालवावी लागली. त्यामुळे आज डबेवाल्यांनी आपली सेवा बंद ठेवली आहे.