कचरा पेटविल्यामुळे निलगिरीच्या झाडांना धोका
By Admin | Updated: May 21, 2016 01:28 IST2016-05-21T01:28:24+5:302016-05-21T01:28:24+5:30
वालचंदनगर-जंक्शन मार्गावरील निलगिरीच्या झाडांच्या बुंध्यालाच कचरा टाकून तो पेटवून दिला जात आहे

कचरा पेटविल्यामुळे निलगिरीच्या झाडांना धोका
बारामती : वालचंदनगर-जंक्शन मार्गावरील निलगिरीच्या झाडांच्या बुंध्यालाच कचरा टाकून तो पेटवून दिला जात आहे. त्यामुळे ही झाडे केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका आहे. हा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
वालचंदनगरच्या नवीन बसस्थानकासमोर परिसरातील नागरिक कचरा टाकतात. त्यानंतर जास्त कचरा झाल्यावर पेटवून दिला जातो. त्यामुळे निलगिरीच्या झाडांचा बुंधादेखील पेटला जातो. परिणामी अनेक झाडे कोसळण्याच्या मार्गावर आहेत. यापूर्वी अशाच प्रकारे झाडे कोसळून अपघात झाले होते.
या संदर्भात पाटबंधारे शाखाधिकारी एस. एस. भोसले यांनी सांगितले, की याबाबत या परिसरातील नागरिकांना सातत्याने सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर ग्रामपंचायतीला देखील कचराबाबत माहिती दिली आहे. झाडांच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना केली जाणार आहे.
ज्या झाडांचा बुंधा जळाला आहे. ती तोडण्यासाठी वनविभागाची परवानगी घेणार आहे. त्यानंतर झाडे तोडण्यात येतील.