अन्नसुरक्षा कायद्यामुळे शेतमजुरांची कमतरता!

By Admin | Updated: October 7, 2014 23:35 IST2014-10-07T23:34:49+5:302014-10-07T23:35:20+5:30

शेतकामासाठी रोहयोचे मजूर देणार असल्याची शरद पवार यांची वाशिम येथील ग्वाही.

Due to food security law shortage of laborers! | अन्नसुरक्षा कायद्यामुळे शेतमजुरांची कमतरता!

अन्नसुरक्षा कायद्यामुळे शेतमजुरांची कमतरता!

वाशिम : केंद्रामध्ये सत्तेत असताना अन्नसुरक्षा कायदा अंमलात आणण्यासाठी आपण प्रयत्न केले होते. या कायद्यामुळे लोकांना अत्यंत स्वस्त दरात धान्य मिळू लागले हे खरे; मात्र दुसरीकडे शेतीमध्ये कामं करण्यासाठी मजुरांची कमतरता भासू लागली. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यास, यावर उपाय म्हणून रोजगार हमी योजनेचे मजूर शेती कामासाठी उपलब्ध करून दिले जातील, अशी ग्वाही माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी मंगळवारी वाशिम येथील जाहीर सभेत केले.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. महाराष्ट्रातील ७0 टक्के नागरिक ग्रामीण भागात राहतात आणि त्यापैकी ६४ टक्के शेती व्यवसाय करतात. त्यापृष्ठभूमिवर आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास, आपले सरकार यापुढेही शेतकर्‍याच्या विकासासाठी कटिबद्ध राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिपक ढोके यांनी केले. माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे आणि बाबाराव खडसे पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

Web Title: Due to food security law shortage of laborers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.