पाढे न आल्याने मुलीचा पित्याच्या शिक्षेमुळे मृत्यू

By Admin | Updated: July 13, 2016 03:42 IST2016-07-13T03:42:01+5:302016-07-13T03:42:01+5:30

पाढे म्हणताना अडखळल्यामुळे संतापलेल्या पित्याने चक्क बाजूला पडलेला कांदा उचलून चिमुरडीच्या तोंडात कोंबला. तो घशात अडकल्यामुळे श्वास गुदमरून तिचा करुण अंत झाला.

Due to the father's punishment due to the failure of the girl to die, | पाढे न आल्याने मुलीचा पित्याच्या शिक्षेमुळे मृत्यू

पाढे न आल्याने मुलीचा पित्याच्या शिक्षेमुळे मृत्यू

औरंगाबाद : पाढे म्हणताना अडखळल्यामुळे संतापलेल्या पित्याने चक्क बाजूला पडलेला कांदा उचलून चिमुरडीच्या तोंडात कोंबला. तो घशात अडकल्यामुळे श्वास गुदमरून तिचा करुण अंत झाला. ही दुर्दैवी घटना बीड बायपास रोडवरील बाळापुरात घडली.
भारती कुटे (६) असे या चिमुरडीचे नाव आहे. ती जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिलीत शिकत होती. पिता राजू कुटे (३०) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती चिकलठाणा ठाण्याचे निरीक्षक चतुर्भुज काकडे यांनी दिली. राजू हा पत्नी अनुसया, मुलगी भारती व तीन वर्षीय मुलगा, आई सरसाबाई आणि भाऊ सचिन यांच्यासोबत राहतो. मोलमजुरी करून तो कुटुंबाची उपजीविका भागवीत होता. शनिवारी रात्री राजूने भारतीचा अभ्यास घेण्यास सुरुवात केली. त्याने तिला पाढे म्हणण्यास सांगितले. १२पर्यंत तिने बरोबर पाढे म्हटले. पण पुढे तिला काही आठवेना. राजूने अनेकदा दरडावून विचारल्यानंतरही तिला पुढचा पाढा म्हणता आला नाही. त्यामुळे राजू संतापला अन् त्याने बाजूला पडलेला मोठा कांदा उचलला व तो भारतीच्या तोंडात कोंबला. कांदा थेट घशात जाऊन अडकल्याने तिचा श्वास गुदमारला भारती तडफडू लागली. हे पाहून तिची आई अनुसया धावत आली. तिने आपल्या चिमुकलीच्या तोंडात अडकलेला कांदा काढण्याचा प्रयत्न केला; परंतु तो निघेना. काही क्षणातच भारतीची हालचाल मंदावली आणि ती बेशुद्ध पडली. आईने धावत जाऊन दिराला बोलावून आणले. मग तिला गाडीने कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये आणले. खेळता खेळता भारतीने कांदा गिळला, असे तिच्या घरच्यांनी हॉस्पिटलमध्ये सांगितले. डॉक्टरांनी तेथे तिला तपासून मृत घोषित केले आणि शवविच्छेदनासाठी प्रेत घाटी रुग्णालयात घेऊन जाण्याचे डॉक्टरांनी सांगितले.
शवविच्छेदन टाळले
पोलिसांचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून राजूने घडलेला प्रकार गावात सांगू नका, असे घरच्यांना बजावले आणि भारतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात नेण्याऐवजी थेट गावात रात्री परत आणला. रविवारी सकाळीच स्मशानभूमीत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. (प्रतिनिधी)

Web Title: Due to the father's punishment due to the failure of the girl to die,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.