भाड्याच्या बसमुळे महामंडळाला नुकसान
By Admin | Updated: September 30, 2015 02:26 IST2015-09-30T02:26:03+5:302015-09-30T02:26:03+5:30
आर्थिक संकटातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एसटी महामंडळाने ५00 बसेस भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. भाड्याने बस घेताना महामंडळाला नुकसानीला सामोरे जावे लागणार असून
_ns.jpg)
भाड्याच्या बसमुळे महामंडळाला नुकसान
मुंबई : आर्थिक संकटातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एसटी महामंडळाने ५00 बसेस भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. भाड्याने बस घेताना महामंडळाला नुकसानीला सामोरे जावे लागणार असून, स्वत:च्या मालकीच्या बस मात्र महामंडळाला फायदेशीर ठरणाऱ्या आहेत.
एसटीतील सूत्रांकडून सांगण्यात आले की, एसटी महामंडळाला भाड्याच्या बसमुळे प्रति किलोमीटर १८ रुपये फायदा आहे, तर स्वत:च्या मालकीच्या प्रत्येक बसमागे प्रति किमी २६ रुपये फायदा निश्चित केला आहे. त्यामुळे स्वत:च्या मालकीच्या बस ताफ्यात आल्यास महामंडळाला मोठा फायदा आहे. या बस त्यामुळेच फायदेशीरही ठरतील. परंतु महामंडळाने तब्बल ५00 बस भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रस्ताव तयार असून, त्यावर निर्णय झाल्यास महामंडळाला महागात पडू शकतो. त्यामुळे महामंडळ स्वत:च्या मालकीच्या बस विकत का घेत नाही, हा मोठा प्रश्न असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)