वीज बिल थकवल्याने धुळ्याच्या आरटीओ कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित
By Admin | Updated: February 20, 2017 17:37 IST2017-02-20T17:37:59+5:302017-02-20T17:37:59+5:30
येथील आरटीओ कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापासून ४ लाख ७७ हजार ९३४ रुपये एवढं वीज बिल

वीज बिल थकवल्याने धुळ्याच्या आरटीओ कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 20 - येथील आरटीओ कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापासून ४ लाख ७७ हजार ९३४ रुपये एवढं वीज बिल थकवल्यानं वीज वितरण कंपनीने ही कारवाई केली आहे.
वीज वितरण कंपनीने दुसऱ्यांदा आरटीओ कार्यालयाचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात आरटीओ कार्यालयाचा वीज पुरवठा वीज बिल थकवल्यानं खंडीत करण्यात आला होता. वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे आरटीओ कार्यालय अंधारात आहे तर त्याचा कामकाजावरही परिणाम होत आहे.