कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाला होणार दिवसाला 20 कोटींचं नुकसान

By नामदेव कुंभार | Published: October 17, 2017 12:25 PM2017-10-17T12:25:36+5:302017-10-17T18:10:56+5:30

मुंबईची लोकल ही जशी मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाते तशीच गावागावांत पोहोचणारी एसटी बस ही राज्यातील बहुसंख्य सर्वसामान्य जनतेची लाईफलाईन मानली जाते..

Due to the employees' strike, the ST corporation will lose about 20 crores a day | कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाला होणार दिवसाला 20 कोटींचं नुकसान

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाला होणार दिवसाला 20 कोटींचं नुकसान

Next

मुंबई -  मुंबईची लोकल ही जशी मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाते तशीच गावागावांत पोहोचणारी एसटी बस ही राज्यातील बहुसंख्य सर्वसामान्य जनतेची लाईफलाईन मानली जाते. राज्यभरात सध्या दिवाळीची धामधूम आहे. अशात एसटी कर्मचारी संपावर गेल्यामुळे जनतेचे हाल सुरु आहेत. अंगणवाडी सेविकांच्या संपानंतर आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उगारलेय. विविध मागण्यांसाठी राज्यभर सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे महामंडळाला दिवसांला 20 कोटींचं नुकसान होणार आहे. 

दिवाळीमध्ये एसटीला तुडुंब प्रतिसाद मिळत असतो. त्यामुळे इतर दिवसांच्या तुलनेत दिवळातील कमाईही जास्त असते पण मध्यरात्रीपासून कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे महामंडळाला 20 कोटीं किंवा त्यापेक्षा आधिकचा तोटा होणार असल्याची माहिती लोकमतला एसटी व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंग देओल यांनी दिली. ते म्हणाले, की हा संप कामगार न्यायालय आणि औद्योगिक न्यायालयाने चुकीचा ठरवला आहे, त्यामुळे संपामध्ये भाग घेणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. पण काय कारवाई केली जाईल यावर बोलताना त्यांनी मौन बाळगले. कर्मचाऱ्यांचा सुरु असलेल्या हा संप  किती दिवसांमध्ये संपवण्यात प्रशासनाला यश येतं हे पाहण औस्तुक्याचे ठरणार आहे. 

या संपामध्ये राज्यातील 1 लाख 7 हजार कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्यामुळे तब्बल 17 हजार गाड्यांना ब्रेक लागला आहे. 258 बस आगार आणि 31 विभागिय कार्यलयांमध्ये सामसुम आहे.  याआधी 1972 मध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा 12 दिवसांचा संप झाला होता. त्यावेळी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाली होती. त्यानंतर 1996, 2007 सालीही संप झाले होते.

सातवा वेतन आयोग आणि हंगामी पगारवाढीच्या मागणीसाठी आजपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी संपाची हाक दिली. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी तब्बल दोन तास चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र ही चर्चा अयशस्वी ठरल्यामुळे ऐन सणासुदीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप झालाय. त्यामुळे राज्यातील जनतेचे मोठे हाल सुरु आहेत. 

परिवहन खातं शिवसेनेकडे असल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शिवसेना काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्याने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी महाराष्ट्रातील आमदार, खासदारांनी मुखमंत्र्यांकडे लेखी स्वरुपात केली आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या 
- एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा
- पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी
- जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही तो पर्यंत कर्मचारी, कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी. 

Web Title: Due to the employees' strike, the ST corporation will lose about 20 crores a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.