एसटी कर्मचाऱ्यांचा संप : बस स्थानकात स्मशान शांतता; राज्यभरात प्रवाशांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 08:17 AM2017-10-17T08:17:37+5:302017-10-17T18:07:05+5:30

वेतनवाढीच्या मागणीवरून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला मध्यरात्रीपासून सुरूवात झाली. कोल्हापूरात या संपाला हिंसक वळण मिळालं आहे. ऐन सनासुदीत राज्यभर एसटी सेवा बंद झाल्याने राज्यभरात प्रवाशांचे हाल होण्यास सुरूवात झाली आहे.

ST employees begin strike on strike; Travelers from all over the state | एसटी कर्मचाऱ्यांचा संप : बस स्थानकात स्मशान शांतता; राज्यभरात प्रवाशांचे हाल

एसटी कर्मचाऱ्यांचा संप : बस स्थानकात स्मशान शांतता; राज्यभरात प्रवाशांचे हाल

Next
ठळक मुद्देसातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी एसटी मान्यताप्राप्त संघटनेने संपाची हाक दिलीदिवाळीसाठी गावी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे तर जास्तच हाल आहेत.बीडमध्ये दिवाकर रावतेंच्या पुतळ्याचं दहन

मुंबई - वेतनवाढीच्या मागणीवरून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला मध्यरात्रीपासून सुरूवात झाली आहे.  कोल्हापूरात या संपाला हिंसक वळण मिळालं आहे.  कागल बसस्थानकात पुणे-बेळगाव एसटीवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे. तर बीडमधील अंबेजोगाईत परिवाहनमंत्री दिवाकर रावते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आलं आहे. 

ऐन सनासुदीत राज्यभर एसटी सेवा बंद झाल्याने राज्यभरात प्रवाशांचे हाल झाले आहेत. मुंबई, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, ठाणे, बीड यासरख्या शहरातील बस आगारातून एकही एसटी बाहेर पडलेली नाही. सर्व गाड्या आगारातच उभ्या आहेत. एसटी कर्मचारी आगारात जमले असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस देखील दाखल झाले आहेत.

आज पासून दिवाळीला सुरुवात झाली असून दिवाळीसाठी गावी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे तर जास्तच हाल आहेत. ऐन दिवाळीत संप होणार नाही, रात्रीत काही तोडगा निघेल अशी प्रवाशांची अपेक्षा होती. त्यामुळे पहाटे निघणाऱ्या गाड्या पकडण्यासाठी काही जण आले होते. मात्र त्यांना रखडत बसावे लागले. इतर वेळी एस टी स्टँडच्या आवारात अनेक खासगी गाड्या प्रवाशांना आवाहन करत असतात. मात्र संपाच्या भीतीमुळे आज खासगी गाड्याही नसल्याचे प्रवाशांनी सांगितले.

                                                       एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचे LIVE UPDATE   

वाचा -  महाराष्ट्रातील STच्या संपामुळे गोव्यात कदंबच्या 37 गाड्या रद्द- पत्रादेवी, सातार्डा, दोडामार्ग हद्दीपर्यंतच वाहतूक

वाचा  - कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाला होणार दिवसाला 20 कोटींचं नुकसान

मुंबई - खासगी वाहनांना st चालकांनी कुर्ला नेहरू नगर आगार समोर रोखले..

मुंबई : दादर- पुणे ( पिंपरी, चिंचवड) मार्गावरील शिवनेरी बससाठी मोठा प्रवासी वर्ग आहे. दादर येथून दर 15 ते 20 मिनिटांच्या अंतराने शिवनेरी बस धावते. सकाळी एक्स्प्रेसनंतर पुणे शहरात जाणाऱ्या प्रवाशांसाठी शिवनेरी सोईचे ठरते. यामुळे स्थानकावर नेहमीच गर्दी होती.  मात्र संप काळात शिवनेरी स्थानक सुन्न आहे.

नागपूरमध्ये बसस्थानकावरील स्थिती

रत्नागिरी - विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या एस्. टी. बंदमध्ये महाराष्ट्र एसटी. कामगार सेना सहभागी झालेली नाही.  त्यामुळे गुहागरमध्ये अंशतः एस्. टी. वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. ज्यावेळी बस स्थानकात लावण्यात आली तेव्हा कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी त्यात हस्तक्षेप केला आणि काही बसेस प्रवाशांना घेऊन मार्गस्थ झाल्या.

पाहा राज्याभरातील स्थिती -

- अन् रापमची एकही लालपरी धावलीच नाही, बस स्थानकात स्मशान शांतता

 - एसटी संप हा सरकारने लादलाय, पण आजही आम्ही वाटाघाटीसाठी तयार: जयप्रकाश छाजेड, अध्यक्ष, इंटक

वाचा -  पुण्यातून एकही बस सुटली नाही, खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची होतेय लूट

वाचा - लाल परी थांबली ! मराठवाड्यात एसटी कर्मचा-यांच्या संपाला उत्फूर्त प्रतिसाद, प्रवाशांचे प्रचंड हाल तर खाजगी वाहतूक सुसाट

वाचा - कामगार, औद्योगिक कोर्टान संपाला ठरवलं चुकीचं, कर्मचाऱ्यांनी संप मागे न घेतल्यास होणार कायदेशिर कारवाई

- यवतमाळ जिल्ह्यातील एसटी प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. जिल्ह्यात एसटीचे 9 आगार असून साधारण 2800 कर्मचारी आहेत आणि बहुतांश कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतला आहे.
 
नाशिक: वेतनवाढीच्या मुद्दयावरुन एसटी कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपामुळं नाशिकमध्येही प्रवासी वाहतूक ठप्प राहिली. सोमवारी मध्यरात्रीपासूनच एसटी बंद झाल्यानं दिवाळ सणासाठी गावी निघालेल्या प्रवाशांचे चांगलेच हाल झाले

कल्याण एसटी डेपोमध्ये कामगारांचा संप, पहाटेपासून अनेक प्रवासी डेपोत खोळंबले

सातवा वेतन आयोग लागू करावा, पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनेकडून हा संप पुकारण्यात आलाय. जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनाबद्दल सुधारित करार होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. मात्र या निवेदनाला मुख्यमंत्र्यांनी कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. बेस्ट कर्मचा-यांच्या तोंडाला पाने पुसली गेल्याने भाऊबीजेला तेही आता संपाचे हत्यार उपसणार आहेत. 

- औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकात पोलीस आणि आरटीओ कर्मचाऱ्यांत बाचाबाची. पोलीस अधिकाऱ्यांना कल्पना न देता बसस्थानकात खाजगी बस लावल्यावरून शाब्दिक वाद.

- औरंगाबाद : बसस्थानकात लागलेल्या खाजगी बसेस एसटी कर्मचा-यांनी लावल्या पिटाळून.

 

वेतनवाढीच्या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी सोमवारी (16 ऑक्टोबर ) मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. (स्थळ - अमरावती) 

- पुणे ; नेहमी प्रवासी आणि बस ने भरलेले स्वारगेट एस टी बसस्थानक आज पूर्णपणे रिकामे होते एकही बस नव्हती. अनेक प्रवासी बस ची वाट पहात थांबले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी बसस्थानकावर येऊन प्रवाशांची विचारपूस केली.

- अकोला - ST च्या संपला अकोल्यात 100% प्रतिसाद

- बीडमध्ये दिवाकर रावतेंच्या पुतळ्याचं दहन

- कोल्हापूरात एसटी संपाला हिंसक वळण, पुणे-बेळगाव एसटीवर कागल बसस्थानकात अज्ञातांकडून दगडफेक

- रत्नागिरी - रत्नागिरीमध्येही एस्. टी.चा कडकडीत बंद, पहाटेपासू स्थानक तसेच शहरभरातील थांब्यावर शेकडो प्रवासी ताटकळले.

- सोलापूर - एस टी कर्मचारी संपाचा सोलापूरवर परिणाम.

- पुणे - सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे पुण्यात प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. पहाटेपासून स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन येथील एस टी स्टँडवर प्रवाशांची गर्दी दिसत आहे.  कर्मचाऱ्यांनी सोमवारी रात्री बारा वाजल्यापासूनच काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे रात्रीपासूनच काही प्रवाशांना स्टँडवर थांबावे लागले आहे. इतर वेळी एस टी स्टँडच्या आवारात अनेक खासगी गाड्या प्रवाशांना आवाहन करत असतात. मात्र संपाच्या भीतीमुळे आज खासगी गाड्याही नाहीत.

पुण्यातील काही बसस्थानकात चोख पोलिस बंदोबस्त आहे.

  

 

खासगी बसेसची मदत

एसटी कर्मचा-यांच्या संपाबाबत शासनाने पर्यायी व्यवस्थेची तयारी केली आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व खासगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपन्यांच्या मालकी बस आणि मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतुकीसाठी मान्यता दिली आहे.

Web Title: ST employees begin strike on strike; Travelers from all over the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.