पोहोण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

By Admin | Updated: October 16, 2016 16:35 IST2016-10-16T16:35:51+5:302016-10-16T16:35:51+5:30

मित्रांसोबत पोहोण्यासाठी गेलेल्या एका १५ वर्षीय मुलाचा विहिरीतील झुडुपाला अडकून मृत्यू झाल्याची घटना जळकोट तालुक्यातील उमरगा (रेतू) येथे रविवारी

Due to drowning, the child drowning to death | पोहोण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

पोहोण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 16 -  मित्रांसोबत पोहोण्यासाठी गेलेल्या एका १५ वर्षीय मुलाचा विहिरीतील झुडुपाला अडकून मृत्यू झाल्याची घटना जळकोट तालुक्यातील उमरगा (रेतू) येथे रविवारी सकाळी घडली आहे.
बालाजी शिवाजी पद्मगीरवार (१५, रा़ उमरगा रेतू, ता़ जळकोट) असे विहिरीत बुडून मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे़ बालाजी पद्मगीरवार हा रविवारी सकाळी आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी विहिरीवर गेला होता़ इतर मुलांप्रमाणे त्याने विहिरीत उडी मारली़ मात्र, विहिरीतील काटेरी झुडुपास तो अडकला़ .
बालाजी पाण्याबाहेर येत नसल्याचे पाहून सोबतच्या मित्रांनी आरडाओरड केल्याने गावातील नागरिक जमा झाले़ गावकºयांनी तात्काळ जळकोट पोलिसांना माहिती दिल्याने पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन बालाजीचा शोध घेण्यास सुरुवात केली़ मात्र, त्यांना यश आले नाही़ त्यामुळे उदगीरच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले़ या दलाच्या पथकाने विहिरीत लोखंडी तीन- चार गळ टाकले़ त्यातील एका गळास तो अडकल्याने पाण्याबाहेर काढण्यात आले़ मात्र, पाण्याबाहेर निघण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता़ याप्रकरणी जळकोट पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Web Title: Due to drowning, the child drowning to death