अवकाळी पावसाने तरकारी पिके धोक्यात
By Admin | Updated: May 10, 2014 20:30 IST2014-05-10T19:41:42+5:302014-05-10T20:30:00+5:30
अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तरकारीची पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अवकाळी पावसाने तरकारी पिके धोक्यात
भिगवण- अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तरकारीची पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर उसाच्या पिकाला पावसाने आधार दिला आहे. मात्र विहिरींचे पाणी जाण्याची भीती शेतकर्यांमध्ये निर्माण झाली आहे.
काल सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली तासभर चाललेल्या पावसाने हवेत उष्णता वाढली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. तरी फळबागांना नुकसान होणार आहे. आंब्याची नासाडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. डाळींब बागांवर तेल्याचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे. तर चिकू केळीवरही रोगांचा प्रादूर्भावामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे.
उन्हाळयाची तीव्रता वाढली असताना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. मात्र अवकाळी पावसाने हात पंपांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. कलिंगड व खरबुज नासण्याची शकयता आहे यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तर अशा अवकाळी पावसामुळे पावसाळयातील पाऊस कमी पडतो अशी चर्चा शेतकर्यांमध्ये आहे.