‘पोलीस महासंचालकांची उचलबांगडी करा’
By Admin | Updated: February 19, 2015 01:52 IST2015-02-19T01:52:00+5:302015-02-19T01:52:00+5:30
पोलीस महासंचालक निष्क्रिय अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याने त्यांची उचलबांगडी करावी, अशी संतप्त मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे केली आहे.

‘पोलीस महासंचालकांची उचलबांगडी करा’
पाथर्डी(अहमदनगर) : राज्यात महिलांवर अत्याचार वाढत आहेत़ कायदा व सुव्यवस्थेची तर लक्तरेच लोंबत आहेत़ राज्याचे पोलीस महासंचालक निष्क्रिय अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याने त्यांची उचलबांगडी करावी, अशी संतप्त मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे केली आहे.
विखे यांनी वाळूतस्करांच्या हल्ल्यात मृत्यू झालेले पोलीस
नाईक दीपक कोलते यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कोल्हापूरमधील गोविंद पानसरेंवरील हल्ला, हिंगोली व मुंब्रा येथे महिलेवर अत्याचार तसेच दलितांवरील अत्याचारांच्या घटनांत वाढ झाल्याचा आरोप त्यांनी
केला. (प्रतिनिधी)